spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्रातील नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार ‘या’ दिवशी होणार?

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 12 किंवा 13 जुलैला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई : शिंदे आणि फडणवीस यांच्या शपथविधी झाल्या नंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींनी जोर धरला आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 12 किंवा 13 जुलैला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये येत्या काही दिवसात खाते वाटपावर चर्चा होणार आहे. काही दिवसानंतर विधीमंडळाचे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या आधीच नवीन मंत्री आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात खाते वाटपावर चर्चा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. काही महत्त्वाची खाती शिंदे गटाला मिळणार आहे. भाजपकडे गृह, महसूल खाते जाण्याची शक्यता आहे. तर, शिंदे गटाकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खाते जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : 

दादा भुसे आणि सुहास कांदे यांना पर्याय शोधा; उध्दव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

महाविकास आघाडीत असताना शिंदे गटातील 9 मंत्र्यांची खाती काढून घेण्यात आली होती. त्या सर्व मंत्र्यांना पुन्हा एकदा मंत्रिपद दिले जाऊ शकते. तर 6 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री करण्यात येणार आहेत. शिंदे गटातील अन्य संभाव्य मंत्र्यांमध्ये दीपक केसरकर, दादा भुसे, अब्दुल सत्तार, बच्चू कडू, संजय शिरदत, संदीपान भुमरे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश आबिडकर यांचा समावेश आहे.

सध्याच्या राजकिय घाडामोडीवर उद्धव ठाकरेंची भूमिका

“लढायचे असेल तर सोबत राहा. भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मध्यावधी लावावी, मग पाहू, पण ही शिवसेना कधीच संपणार नाही. मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी नेहमी लढत राहिन. ज्यांना लढायचं असेल त्यांनी सोबत राहा. असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी नव्या सरकारला केले आहे.

बिग बॉस होस्टिंग साठी नवीन नाव चर्चेत

Latest Posts

Don't Miss