spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sharad Pawar : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, भाजपने उमेदवार देऊ नये ; शरद पवार

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल आणि याने महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचं समर्थन करत आज पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ऋतुजा रमेश लटके या निवडणूक लढत आहे. मुरजी पटेल यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकी झाली. मी राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून तेंव्हा भूमिका घेतली होती की, मुंडेच्या परिवारातील कोणीही उभा राहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभा करणार नाही, अशी भूमिका घेतली होती.

हेही वाचा : 

NCP : नागपूरमधील ‘रस्त्यांची रांगोळी’ म्हणत राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला

शरद पवार म्हणाले की, ही निवडणूक फक्त दीड वर्षासाठी आहे, वर्ष दीड वर्षासाठी ही निवडणूक टाळता आली तर बरं होईल. अर्ज मागे घेण्याची वेळ अजून गेलेली नाही. त्यामुळे आज मी संबंधितताना आवाहन केलं आहे. मला स्वतः ला वाटत एक वर्षासाठी निवडणूक नको. ते म्हणाले, रमेश केरे यांनी मला काही मेसेज काही दिवसांपूर्वी केले होते, आशा प्रकारची टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. अंधेरी येथी पोटनिवडणुक बिनविरोध होणे हे योग्य राहील, राज्यातील पक्षांने राजकीय परंपरा पाळणे गरजेचे आहे. असे शरद पवार यांनी म्हटले.

World Food Day 2022 : जागतिक अन्न दिनानिमित्त काही खास विविध राज्यातील पारंपरिक पदार्थ

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचेही आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाजपला पत्र लिहित ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्याची भाजपकडे मागणी केली आहे. लटके यांच्या विरोधात उमेदवार देऊ नका, हे आपल्या संस्कृतीशी सुसंगत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपला उमेदवार न देण्याची भावनिक साद घातली आहे.

Global Hunger Index 2022 : जागतिक उपासमार निर्देशांकात भारत १०७ व्या क्रमांकावर, पाकिस्तान, बांग्लादेश नेपाळही भारताच्या पुढे

Latest Posts

Don't Miss