spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या पत्रावर शिंदेगटाने दिली पाहिली प्रतिक्रिया म्हणाले…

पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ही निवडणूक लढाऊन द्यावी याठिकाणी भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढवू नये

गेल्या अनेक दिवसांपासून अंधेरी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे आणि ठाकरे गटात न्यायालयीन वाद सुरू होता. या निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून शिवसेना नाव आणि शिवसेनेचे चिन्ह धनुष्य बाण हे चिन्ह मिळावं यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना आणि ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, असे नाव आणि ढाल तलवार आणि मशाल ही चिन्ह देण्यात आली.

अंधेरी पूर्वचे आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर या विधानसभेच्या जागेसाठी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ही निवडणूक लढाऊन द्यावी याठिकाणी भारतीय जनता पार्टीने निवडणूक लढवू नये, असे पत्र मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिल्यानंतर याच्या बाबतीत युतीचा उमेदवार असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री अणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असं मात्र शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केलं आहे.

“एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) या विधानसभेच्या जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दिवंगत रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. त्यामुळे माझी विनंती आहे की, भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.”, असं भावनिक आवाहन राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्रातून केलं आहे.

पण, राज ठाकरेंच्या या पत्रानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चा निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

Nirmala Sitharaman : रुपया कमजोर नाही, डॉलर मजबूत होत आहे : निर्मला सीतारामन यांचे विधान

BJP Diwali : दहीहंडी, नवरात्रीनंतर वरळीत भाजपाची हवा, यंदाची दिवाळी जोरात विजेत्यांना देणार लाखोंची बक्षीसं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss