spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Crab : खेकडा खाण्याचे फायदे

Crab खेकडा खाल्याने आरोग्यावर चांगले फायदे होतात. खेकड्यांमध्ये मिनरल्स , व्हिटॅमिन्स असे पोषक घटक असतात. पण खेकडा जास्त प्रमाणात खाऊ नये. जास्त प्रमाणात खाल्याने तो गरम पडू शकतो आणि आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात. जसे आपण चिकन पासून चिकन लॉलीपॉप , चिकन सूप , चिकन असे वेगवेगळे पदार्थ बनवतो. तसेच आपण खेकड्या ( Crab) पासून देखील बनवू शकतो. जसे की खेकडा मसाला , खेकडा सूप , खेकडा लॉलीपॉप (Crab Lolipop) असे पदार्थ बनवू शकतो. चला तर मग खेकडा खाण्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊया.

हे ही वाचा : खमंग चिकन कटलेट सँडविचची रेसिपी घ्या जाणून…

 

मधुमेहाच्या रुग्णांनी खेकड्याचे सेवन करणे. खेकड्यांमध्ये उच्च प्रतीचे क्रोमियम आढळते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. खेकडयांच्या बाहेरील मास मध्ये कार्बोनेट आढळते. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी खेड्याचे सेवन करावे.

खेकड्यांमध्ये जास्त प्रमाणात मिनरल्स आढळते. त्यामुळे ऍसिडिटीचे प्रमाण कमी होते. आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका देखील कमी होतो. म्ह्णून ज्यांना कॅन्सरचा धोका आहे त्यांनी खेकडे खाणे.

खेकड्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिडचा पुरवठा जास्त प्रमाणात आढळतो. तसेच सॅच्युरेटेड फेटन्स रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. तसेच खेकड्यात नोमियान आणि क्रोमियम आढळते त्यामुळे देखील कोलेस्ट्रेलची पातळी नियंत्रित राहते. ज्यांना हृदय विकाराचा धोका आहे त्यांनी खेकडे खाणे.

 

निरोगी आरोग्यासाठी खेकडा हे उत्तम सीफूड आहे. सर्दी झाल्यास शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी तुम्ही खेकड्याचे सेवन करू शकता. त्यामुळे नक्कीच छातीत कफ आणि सर्दी झाली असेल तर त्याचा त्रास होत नाही. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. उत्तम आरोग्य आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही खेकडयांचे सेवन केले पाहिजे.

हाडांच्या मजबूतीसाठी खेकडा खूप उत्तम आहे. खेकड्यामध्ये कॅल्शिअम जास्त प्रमाणात असते. ज्यांना सांंधेदुखी किंवा हाडांच्या ठिसूळपणाचा त्रास होत असेल तर तुम्ही आहारात आठवड्यातून एकदा तरी खेकड्याचे सेवन करावे. खेकड्याचे मांस काढून किंवा त्याचे सूप बनवून तुम्ही आहारात त्याचा समावेश करू शकता.

हे ही वाचा :

रोज ‘या’ पदार्थाचे सेवन करा… बिपीचा त्रास होईल गायब

 

Latest Posts

Don't Miss