spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रसिद्ध ज्योतिष चंद्रशेखर गुरु यांची दोन अज्ञात व्यक्तींकडून निर्दयी हत्या

सरल वास्तूचे संस्थापक तसेच प्रसिद्ध ज्योतिष चंद्रशेखर गुरुजी यांची निर्दयी हत्या करण्यात आली आहे.

कर्नाटक : सरल वास्तूचे संस्थापक तसेच प्रसिद्ध ज्योतिष चंद्रशेखर गुरुजी यांची निर्दयी हत्या करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हॉटेलच्या रिसेप्शनजवळ त्यांच्यावर चाकूने वार करत हत्या केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. आज मंगळवारी दुपारी 12 सुमारास ही घटना घडली.

दिवसाढवळ्या हॉटेलमध्ये झालेल्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी चंद्रशेखर गुरु यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघेही तिथून पळून गेले. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओनुसार, हॉटेलच्या लॉबीत दोन अज्ञात व्यक्तींनी चंद्रशेखर गुरुजी यांचे चरण स्पर्श केले. त्यानंतर त्यांनी गुरुजीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यानंतर हॉटेलमध्ये गोंधळ उडाला. या गोंधळातच हल्लेखोर पसार झाले.

हेही वाचा :  

बसमधील जागेवरून दोघांचं भयंकर भांडण; व्हिडिओ झाला व्हायरल

काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर यांच्या विरोधात काही कर्मचाऱ्यांनी आपल्या थकित पगारासाठी धरणे आंदोलन केले होते. त्यापैकी काही कर्मचाऱ्यांचा यात काही सहभाग आहे का, या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत.

चंद्रशेखर गुरुजी मूळचे बागलकोटचे होते आणि काही कौटुंबिक कामाच्या निमित्ताने हुबळी येथे आले होते. सरल वास्तू नावाने म्हणून प्रसिद्ध असलेले ज्योतिषाचार्य चंद्रशेखर यांच्या हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या फुटेजमध्ये गुन्हेगार हत्या केल्यानंतर सरळ पळताना दिसत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. तसेच पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रातील नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार ‘या’ दिवशी होणार?

Latest Posts

Don't Miss