spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

फडणवीसांना पत्र लिहिल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी भाजप पक्ष….”

भाजपा हा एक वेगळा पक्ष आहे. तो पक्ष मी चालवत नाही. मी फार तर विनंती करू शकतो.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींन वेग आला आहे. शिंदे – भाजपगटाकडून मुरजी पटेल तर उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पण, राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत निवडणूक न लढवण्याचे आवाहन केले होते आणि त्यांनी फडणवीसांना पाठवलेल्या याच पत्रावर त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, रमेश लटके यांच्या पत्नी निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत. लगेच २०२४ मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे. साधारण वर्षभरासाठी ही आमदारकी असेल. याच कारणामुळे मी देवेंद्र फडणवीस यांना भाजपाने निवडणूक न लढवण्याची विनंती केली. सध्या जे चित्र उभे आहे, त्यामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रातून एक चांगला संदेश जाईल. राजकारणात पुढे येणाऱ्या तसेच सध्या राजकारणात असलेल्या लोकांना महाराष्ट्राची ही संस्कृती या निमित्ताने कळेल, असे राज ठाकरे म्हणाले.

भाजपा हा एक वेगळा पक्ष आहे. तो पक्ष मी चालवत नाही. मी फार तर विनंती करू शकतो. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्यापर्यंतच हा विषय मर्यादित होता. यापलीकडे मी भारतीय जनता पार्टीच्या राजकारणामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. त्यात माझा संबंधही नाही. त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी सल्ला देऊ शकत नाही, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

विरोधकांना काय विचार करायचा ते करू देत. एखाद्याला कावीळ आजार झाला असेल, तर त्याला सगळे जग पिवळे दिसते. मी स्वच्छ मनाने काही गोष्टी सांगितल्या आहेत. स्वीकारायच्या असतील तर स्वीकारा अन्यथा सोडून द्या. या निवडणुकीसाठी मी उमेदवार उभा करत नाहीये, असे म्हणत राज यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे.

हे ही वाचा:

हे दलितांचे. हे माळ्याचे…इतका घाणेरडा विचार असलेला महाराष्ट्र मी याआधी कधी पाहिलेला नाही, राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप

राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पाठवलेल्या पत्रावर शिंदेगटाने दिली पाहिली प्रतिक्रिया म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss