spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोबाईलच्या टॉर्चमध्ये पार पडली शिंदे सरकारच्या ‘या’ मंत्र्याची सर्जरी; एका फटक्यात जनरेटर मंजूर

अचानक वीज जाणे हे सर्वसामान्यासाठी अतीसामन्य गोष्ट आहे. पण, जर दाताची शस्त्रक्रिया सुरू असेल आणि अचानक वीज गेली तर काय होईल. नक्कीच राग अनावर होईल.

अचानक वीज जाणे हे सर्वसामान्यासाठी अतीसामन्य गोष्ट आहे. पण, जर दाताची शस्त्रक्रिया सुरू असेल आणि अचानक वीज गेली तर काय होईल. नक्कीच राग अनावर होईल. असाच प्रसंग राज्याचे रोहयो मंत्री आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासोबत घडला आहे. या घटनेमुळे मंत्री कमालीचे संतापले होते.

राज्याचे रोहयो मंत्री आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे एका वेगळ्याच संकटाचा सामना कराव लागल्याची घटना समोर आली. भुमरे यांची औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयात त्यांच्या दाताची सर्जरी होणार होती. त्यानुसार, भुमरे हे सर्जरीसाठी रुग्णालयात दाखल झाले. पण, सर्जरी सुरू असतानाच, अचानक लाईट गेल्याचा प्रकार समोर आला. अचानक लाईट गेल्यामुळे भुमरे यांची शस्त्रक्रिया थांबवावी लागली. गमंत म्हणजे, सरकारी रुग्णालयात जनरेटर नसल्याने गोंधळात आणखीनच भर पडली.

मग सर्जरी सुरू असताना नेमकं काय करावं, डॉक्टरांना सुचेनास झाले. पण, शो मस्ट गो ऑन म्हणत डॉक्टरांच्या सहकाऱ्यांनी मोबाईल काढला आणि टॉर्च सुरू केली. मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात मंत्रीमहोदयांची शस्त्रक्रिया सुरू झाली. थोड्याच वेळात लाईट येईल अशी अपेक्षा ठेवून सर्जरी झाली पण शेवटपर्यंत काही वीज आलीच नाही. त्यामुळे मोबाईलच्या टॉर्चमध्ये संदीपान भुमरे यांच्या दातावर सर्जरी पार पडली.

विशेष म्हणजे, लाईट गेल्यावर देखील रुग्णालयात जनरेटरची सोय नसल्याने भुमरेंनी संताप व्यक्त केला. जर एखाद्या मंत्र्याला शासकीय रुग्णालयात हा अनुभव आला असेल तर सर्वसामान्य रुग्णांचे काय होत असेल अशी चर्चा रुग्णालय परिसरात रंगली.

औरंगाबाद शासकीय दंत महाविद्यालयाकडून गेल्या पाच वर्षांपासून जनरेटर उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात होती. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. परंतु, काल पालकमंत्र्यांवरच उपचार सुरु असताना लाईट गेल्याने जनरेटरची निकड प्रशासनाच्या लक्षात आली. संदीपान भुमरे यांनी ‘याचि देही याचि डोळा’ जनरेटरमुळे होणारी अडचण पाहिली. त्यामुळे भुमरे यांनी जागच्या जागी औरंगाबाद शासकीय दंत महाविद्यालयाच्या जनरेटरसह इतर मागण्यांना मंजुरी दिली.नवीन जनरेटर येईपर्यंत कोविड केअर सेंटरमधील जनरेटर आणावे असेही निर्देश भुमरे यांनी यावेळी दिले.

हे ही वाचा:

फडणवीसांना पत्र लिहिल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी भाजप पक्ष….”

Congress : मला लाज वाटत नाही… गांधी परिवाराच्या ‘रिमोट कंट्रोल’ प्रश्नाला खर्गे यांचे उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss