spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हा निर्णय घेतल्याबद्दल भाजपाचे आभार – नरेश म्हस्के

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने (Announce Withdraw Candidate From Andheri East Bypoll) केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबतची घोषणा केली. त्यानंतर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपाचे आभार मानले आहे.

आमच्या सर्व आमदारांचं सुरवातीपासूनच म्हणणं होतं भारतीय जनता पार्टीने सहानभूतीपूर्वक अंधेरी पूर्व पोटनिवडणुकी संदर्भात विचार करावा. आमचं म्हणणं भारतीय जनता पार्टीने ऐकल्याबदल आम्ही सर्वांतर्फे भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो. जर रमेश लटके हयात असते तर आम्ही जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेशी सहमत असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वांचे हे श्रेय आहे. जे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत त्यांना समजावलं जाईल. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. अरविंद सावंतांच्या प्रतिक्रियेला मला उत्तर द्याच नाही आहे. अश्या लोकांनमुळेच पक्षाची हि अवस्था झाली आहे.

तर अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजप-शिंदे गट युतीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माध्यमांशी बोलताना आपण पक्षाच्या आदेशाचं पालन करु असं स्पष्ट सांगितलं. तसेच, मी एकदम खूश आहे आणि पक्षाचा आदेश मानणार आहे. त्यावर तुम्ही अपक्ष निवडणूक लढवणार का? असं विचारल्यावर मुरजी पटेल यांनी अजिबात नाही… अजिबात नाही… असं म्हणत आपण पक्षाच्याच आदेशाचं पालन करणार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

हे ही वाचा :

Drishyam 2 Trailer : ‘मी विजय साळगावकर खरं सांगतो की…’; ‘दृश्यम 2’चा ट्रेलर रिलीज

राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र हे ‘स्क्रिप्ट’चा भाग; संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss