spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फूट?

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येणे टाळल्याचे समोर आले आहे. काल दिवसभरात दोन्ही नेत्याचे कार्यक्रम एकत्र असूनही नेते मात्र एकत्र उपस्थित नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही मतभेद आहे का?

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येणे टाळल्याचे समोर आले आहे. काल दिवसभरात दोन्ही नेत्याचे कार्यक्रम एकत्र असूनही नेते मात्र एकत्र उपस्थित नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही मतभेद आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे .कारण गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकाच व्यासपीठावर येणे टाळले आहे. काल दिवसभर दोन्ही नेत्यांचे सोबत कार्यक्रम होते परंतु हे नेते एकमेकांसोबत कार्यक्रमात आले नाहीत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील दुरावा वाढला आहे का ह्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे . त्याचं कारण म्हणजे काल दिवसभर एकत्रित दौरा असूनही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच व्यासपीठावर येणे टाळलं.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे काल दिवसभरात तीन कार्यक्रम एकत्रित होते. मात्र एकाही कार्यक्रमाला दोघं एकमेकांसमोर आले नाहीत. राजभवनावरील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात काही पक्षप्रवेश असल्याचे सांगून टाळलं आणि काल त्यांनी थेट ठाणे गाठलं. काल दिवसभर एकनाथ शिंदे ठाण्यातच होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही ठाण्यात होते ठाण्यातील भागवत कथा आणि बंजारा समाजाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस ठाण्यात असताना एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला येतील अशी अपेक्षा होती. परंतु जोपर्यंत देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात आहेत तोपर्यंत एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. त्यामुळे नेमकं बिनसले काय ? असा प्रश्न सर्वाना पडला आहे.

तसेच समोर आलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा या निवासस्थानी बैठक झाली. यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून चर्चा झाल्याची माहिती आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकमत होत नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आणि याच मतभेदामुळे शिंदे आणि फडणवीस एकाच व्यासपीठावर येण्याचं टाळतात का ? असा सवाल विचारला जातोय.

मुख्यमंत्री शिंदे यांचे रविवार, १६ ऑक्टोबर रोजीचे कार्यक्रम
सकाळी ११ वा.
‘स्टार्टअप वीक’ व ‘स्टार्टअप यात्रा’ मधील विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम
स्थळ – राजभवन, मुंबई.
दुपारी २ वा.
श्रीमद् भागवत कथा ज्ञान महायज्ञ
स्थळ – टीएमसी मैदान, आनंद नगर ठाणे
दुपारी ४ वा.
ऑल इंडिया बंजारा सेवा संघ आयोजित भव्य सत्कार समारंभ
स्थळ – हायलँड गार्डन्स मैदान, बाळकुम, ढोकाळी, ठाणे (प.)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यक्रम –
सकाळी १०.१५वाजता : मुंबई वाहतूक पोलिसांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन, अपोलो क्लिनीक कुलाबा, मुंबई
सकाळी ११ वाजता : महाराष्ट्र स्टार्टअप वीक आणि महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा पुरस्कार वितरण, राजभवन, मुंबई
दुपारी १ वाजता : क्रेडाई-एमसीएचआय प्रॉपर्टी एक्स्पो, एमएमआरडीए मैदान, मुंबई
दुपारी २. १० वाजता : श्रीमद् भागवत कथा, टीएमसी ग्राऊंड, वाय. के. हॉस्टेलसमोर, आनंदनगर, ठाणे
दुपारी ३ वाजता : ऑल इंडिया बंजारा सेवा संघातर्फे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा भव्य सत्कार समारंभ, हायलँड गार्डन सिटी, ठाणे पश्चिम

Latest Posts

Don't Miss