spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PM Modi : नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्टही केलं जाहीर, जाणून घ्या ‘ही’ खास योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेत प्रधानमंत्री किसान सन्मान संमेलन २०२२ चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी रसायने आणि खते मंत्रालयांतर्गत ६०० प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचेही (पीएमकेएसके) उद्घाटन केले. याशिवाय, पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक योजना – एक राष्ट्र एक खत याचा शुभारंभ केला. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) अंतर्गत १६,००० कोटी रुपयांचा १२ वा हप्ता देखील जारी केला. पंतप्रधानांनी कृषी स्टार्टअप परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटनही केले. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी ‘इंडियन एज’ हे खतावरील ई-मासिकही प्रकाशित केले. मोदींनी स्टार्टअप प्रदर्शनाच्या संकल्पना पॅव्हेलियनचा आढावा घेतला आणि प्रदर्शनातील उत्पादनांची पाहणी केली.

हेही वाचा : 

‘साई रिसॉर्ट’ च्या मालकाला तूर्तास दिलासा; हायकोर्टानं कारवाई करण्यापूर्वी रितसर नोटीस बजावण्याचे निर्देश दिले

या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

१. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी झाले नाहीत ते व्या १२हप्त्याच्या लाभापासून ते वंचित राहू शकतात. भारत सरकारने ई-केवायसीसाठी ३१ ऑगस्ट २०२२ ही अंतिम मुदत निश्चित केली होती. मात्र अजूनही पोर्टलवर OTP आधारित ई-केवायसी उपलब्ध आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून केलं नाही त्यांनी त्वरीत ई-केवायसी करुन घ्या.

२. जे शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत. त्या आपत्कालीन शेतकऱ्यांना १२ व्या हप्त्याचा लाभही मिळणार नाही.

३. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अर्ज करताना चुकीची माहिती टाकली होती, त्यांनाही याचा लाभ घेता येणार नाही.

आ. संतोष बांगर यांच्या वर्तणुकीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वैतागले

Latest Posts

Don't Miss