spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मेट्रो ३च्या विरोधात प्रकल्पग्रस्त गिरगाव-काळबादेवी येथील रहिवाशांचे राज्य सरकार विरोधात आंदोलन

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा मेट्रो-३ भुयारी प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत गिरगाव आणि काळबादेवी येथे बाधित होत असलेल्या प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी प्राधिकरणाने आराखडा तयार केले असून गेले पाच वर्ष इथे काम सुरु आहे. या आराखड्यानुसार, भविष्यात काळबादेवी कमर्शियल सेंटर हे व्यावसायिक संकुल तर काळबादेवी हाइट्स आणि गिरगाव हाइट्स ही निवासी संकुले उभी राहणार असे आश्वासन भाजप सरकार सत्तेत असताना केलं आहे. मात्र या परिसरात मासे विक्री करणाऱ्या महिलांनी आज दिनांक १८ ऑक्टोबर रोजी शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सपकाळ यांच्या मार्गदर्शनखाली आंदोलन पुकारलं.

अंधेरीत माघारीनंतर देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

गेले वीस पंचवीस वर्ष मासे विक्री करणाऱ्या महिला चिराबाजार या परिसरात आपल्या व्यवसाय करत असायचे. परंतु मेट्रो तीनच्या प्रकल्पामुळे या महिलांना आपला व्यवसाय बंद करण्या केलीस कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. भाजप सरकार सत्तेत असताना मेट्रो तीन हा प्रकल्प काळबादेवी गिरगाव या परिसरात आणण्यात आला यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर या मासे विक्री करणाऱ्या या कोळी महिलांना दर महिन्याला दहा हजार रुपयांचा भत्ता दिला जायचा परंतु काळानुसार महागाई वाढत असल्याने दहा हजार रुपयांनी घर चालवणे अवघड होत असल्यामुळे या कोळी महिलांनी आज आंदोलन केले.

हेही वाचा : 

दुर्दैवाने काही घडले तर त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार, खासदाराचं पोलीस महासंचालकांना पत्र

दर महिन्याला दहा हजार मिळणार हात भत्ता वाढवून देण्याची विनंती या महिलांनी राज्य सरकारकडे केली आहे कालांतराने राज्य सरकारने आमच्या मागणीची दखल न घेतल्यास आम्ही उपोषण करू असे देखील या महिलांनी म्हटले आहे.

Latest Posts

Don't Miss