spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

केदारनाथमध्ये खाजगी हेलिकॉप्टर दरीत कोसळले, दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू

केदारनाथ येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. हेलीकॉप्टर कोसळून ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी मदतकार्यासाठी पथके रवाना झाली आहेत. केदारनाथमध्ये दाट धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाला असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण आठ जण होते, असं सांगितलं जातंय. उत्तराखंडच्या केदारनाथपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर कोसळलं.

Diwali 2022 : धनत्रयोदशीच्या दिवशी दरवाजात लावा ‘या’ गोष्टी

आर्यन कंपनीच्या हेलिकॉप्टरमध्ये ८ भाविक होते. या भाविकांना घेऊन हे हेलिकॉप्टर जात असताना काळानं ६ प्रवाशांना घाला घातला. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आग भडकली होती. हेलिकॉप्टरचा अक्षरशः चुराडा झाल्याचे थरकाप उडवणारे फोटोही समोर आले आहेत.दुर्घटना झालेल्या ठिकाणी बचाव पथकही रवाना झालंय. सध्या बचावकार्य सुरु आहे.

हेही वाचा :  

मेट्रो ३च्या विरोधात प्रकल्पग्रस्त गिरगाव-काळबादेवी येथील रहिवाशांचे राज्य सरकार विरोधात आंदोलन

Latest Posts

Don't Miss