spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : दिवाळीत घरच्या अंगणात काढा ट्रेंडी आणि सुंदर रांगोळया…

दिवाळीच्या निमित्याने सर्वत्र दिवे आणि रोषणाई पाहायला मिळते. तसेच दिवाळीमध्ये कंदील देखील लावले जातात आणि रोषणाई केली जाते. दिवाळी हा सण आनंद आणि उत्साह घेऊन येतो. तसेच दिवाळी या सणाला वसुबारस (vasubaras) पासून सुरुवात होते आणि हा सण भाऊबीजेला (bhaubeej) संपतो. दिवाळी (Diwali) या सणासाठी अवघे २ दिवसच उरले आहे. तसेच दिवाळीत रांगोळया काढण्याच्या परंपरा आहेत. दिवाळीच्या दिवशी रांगोळया काढून लक्ष्मी मातेचे स्वागत केले जाते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून काही वेगळया प्रकारच्या रांगोळ्या दाखवणार आहोत.

हे ही वाचा: Diwali 2022 : धनत्रयोदशीच्या दिवशी दरवाजात लावा ‘या’ गोष्टी

 

दिवाळीत तुम्ही कमी वेळात आणि पटकन तयार होईल अशी रांगोळी सहज काढू शकता. रांगोळीची रचना ही थोडी कठीण असते पण ती काढायला खूप सोपी असते. रांगोळी मध्ये तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या डिझाइन देखील काढू शकता.

 

दिवाळीच्या निमित्याने तुम्ही स्वस्तिक रांगोळी देखील काढू शकता. तसेच तुम्ही स्वस्तिक दरवाज्यावर देखील काढू शकता. स्वस्तिक काढणे शुभ मानले जाते. तुम्ही रांगोळीच्या बाजूला स्वस्तिक काढून फुलांनी देखील सजवू शकता. त्यामुळे रांगोळी अजून उठून दिसते.

 

तुम्ही अंगणात फुलांची देखील रांगोळी काढू शकता. फुलांच्या रांगोळीमध्ये तुम्ही विविध रंग देखील भरू शकता. फुलांची रांगोळी दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. फुलाने संपूर्ण घर सुंदर वाटू लागते. तसेच दिवाळीमध्ये फुलांना देखील खूप महत्व आहे.

 

 

रांगोळीमध्ये देखील वास्तुशात्रानुसार रांगोळी काढली जाते. यामध्ये रांगोळी काढताना घराच्या दिशा देखील बघितल्या जातात. रांगोळीमध्ये नैसर्गिक रंग देखील वापरू शकता.

 

रांगोळी मध्ये तुम्ही क्रिएटिव्ह रांगोळी देखील काढू शकता. जसे की फुलांपासून, पानांपासून , महेंदीच्या डिझाइन अशा देखील तुम्ही रांगोळ्या काढू शकता. ज्यामुळे ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटेल.

हे ही वाचा: 

Diwali 2022 : दिवाळी सणात ‘या’ गोष्टी घरात आवर्जून करा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss