spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

बुलढाण्यात भाजपाला मोठा धक्का ! कार्यकर्ते करणार ठाकरे गटात प्रवेश

सध्याची मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक हे शिंदे गट आणि भाजपात (BJP) प्रवेश करत आहेत.

सध्याची मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक हे शिंदे गट आणि भाजपात (BJP) प्रवेश करत आहेत. मात्र बुलडाण्यात (Buldana) ठाकरे गटाने भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. बुलढाण्यातील भाजप कार्यकर्ते आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बुलढाण्यातील भाजप कार्यकर्ते मातोश्रीवर हाती शिवबंध बांधणार आहेत. केवळ भाजपच नाही तर जिल्ह्यातील राष्ट्रवादी (NCP) आणि वंचित बहुजन आघाडीचे देखील काही कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघातील हे कार्यकर्ते आहेत. तसेच आज बुलडाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांची बैठक देखील मातोश्रीवर होणार आहे.

दरम्यान या वेळेस बुलढाण्यातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ५० खोके एकदम ओक्केच्या घोषणा या शिवसैनिकांकडून देण्यात आल्या. शिवसैनिक शिंदे गटाविरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. जूनमध्ये अनेक आमदार फुटले, जुलैमध्ये खासदार फुटले मात्र जिल्ह्यात शिवसैनिकांचं संघटनात्मक पातळीवर कार्य सुरू आहे. अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा होती. आज सुदैवाने वेळ जुळून आली. आज निमित्त देखील आहे. भाजप, राष्ट्रवादी, आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आलेल्या कार्यकर्त्यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यकर्ते हाती शिवबंध बांधणार आहेत. हा बुलढाणा भाजपसाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. एकीकडे ठाकरे गटातून बाहेर पडून पदाधिकारी, नगरसेवक हे भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करत आहेत. मात्र दुसरीकडे बुलढाण्यातील अनेक भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. ते एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

हे ही वाचा:

नाशिक कोर्टाकडून खळबळजनक खुलासा, बाबरी मशीद पाडण्याचा PFI चा कट

संजय राऊत तुरुंगातूनही काडी पेटवतात; शहाजीबापूंचा टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss