spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईकरांच्या चिंतेत वाढ :मागील दहा वर्षात गंभीर गुन्हे ११२ टाक्यांनी वाढले.

प्रजा फाउंडेशनच्या आजच्या प्रकाशित झालेल्या अहवालानुसार मागील दहा वर्षात मुंबईतील गंभीर गुन्ह्यात ११२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई शहरांमध्ये मुख्य गुन्ह्यात गेल्या दहा वर्षात कमालीची वाढ झाल्याचे वास्तव ‘मुंबईतील पोलीस यंत्रणा आणि कायदा व सुव्य सद्यस्थिती २०२२’ या प्रजा फाउंडेशनच्या आजच्या प्रकाशित झालेल्या अहवालात समोर आला आहे. २०१२ ते २०२१ च्या कालावधीत गंभीर गुन्ह्यांमध्ये ११२ टक्क्यांनी वाढ झाली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुलभ झाली हे दिलासादायक असले तरी महिला व मुलांवरील गुन्हयांची वाढती संख्या चिंताजनक आहे,असे ह्या अहवालातून समोर आले आहे.त्याच बरोबर मुंबई पोलिसांची २८ टक्के पदे रिक्त असल्याचं समोर आला आहे.

२०१२ ते २०२१ च्या दरम्यान मुंबईत अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये ६५० टक्क्यांनी वाढ झाली आहे तर बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या गुणांमध्ये अनुक्रमित २३५ टक्के आणि १७२ टक्यांनी वाढ झाली आहे. याच कालावधीमध्ये खून चोरी आणि साखळी चोरी यासारख्या गुणांचे प्रमाण अनुक्रमे २७% १६% आणि ८८% ने कमी झाल्याचे दिसून येत आहे.शहरातील गुन्ह्यांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि त्यांचे तपास कार्य योग्य रीतीने होण्यासाठी कायदा व सुव्यवस्था यंत्रणा सज्ज आणि सक्षम असायला पाहिजे. तपासामध्ये पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक याची महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु २०२२ पर्यंतचे आकडेवारी पाहता त्यांची १८ टक्के मंजूर पदे रिक्त असल्याचं समोर आला आहे. २०१८ मध्ये मुंबई पोलीस यंत्रणेत २२ टक्के पदे रिक्त होती तर २०२२ पर्यंत २८ टक्के पदे रिक्त आहेत. गुन्ह्यांची वाढती संख्या पाहता पद भरणे आवश्यक आहे तरच तपासाचे काम वेळेत होईल आणि त्याचा दर्जा ही चांगला राहील.

२०१७ मध्ये ६० टक्के वर्ग २ च्या गंभीर गुन्ह्यांचे जसे हत्या बलात्कार गंभीर दुखापत इत्यादीचे तपास कार्य प्रलंबित होते, तर २०२१ मध्ये हे प्रमाण ६८ टक्के राहिले आहे. सोबतचमहिला व मुलांवरील गुन्ह्यांचे ९६% खटले सन २०२१ पर्यंत सुनावणीसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे एकीकडे तपास करत जलद गतीने व्हायला हवे तर दुसरीकडे सुनावणी सुद्धा तातडीने व्हायला हव्यात, असं प्रजा फाउंडेशन च्या वतीने अहवालात मांडला गेला आहे.

हे ही वाचा :

संजय शिरसाटांच्या हृदयात रक्ताची गुठळी आढळली; प्रकृती आता स्थिर

बीटीएस उचलणार बंदुकी, देशासाठी लढायला बीटीएसची तयारी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss