अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी नुकत्याच मुंबईमध्ये पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. या फॅशन शोमधील जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन या काही फोटोग्राफर्सवर भडकलेल्या दिसत आहेत. आता जया बच्चन (Urfi Javed) यांचा हा व्हायरल व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्री उर्फी जावेदनं जया यांच्यावर टीका केली आहे.
#JayaBachchan at Lakme fashion week in Mumbai 💃🔥😁 @viralbhayani77 pic.twitter.com/MPfjbWv2E8
— Viral Bhayani (@viralbhayani77) October 16, 2022
या व्हायरल व्हिडिओमध्ये जया बच्चन आणि त्यांची नात नव्या नवेली नंदा एअरपोर्टवर जाताना दिसत होत्या. त्यावेळी काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचवेळी एका फोटोग्राफरला ठेच लागून पडता पडता वाचला. यावर जया बच्चन यांनी त्याला ‘तो ठीक आहे की नाही’ हे विचारण्याऐवजी ‘जे झालं ते बरं झालं’ असं त्या म्हणाल्या. ‘तो पुन्हा पडायला हवा..’ असंही त्या म्हणाल्या. जया बच्चन यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता उर्फी जावेदनंही या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे. व्हायरल व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. जया बच्चन या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
जया बच्चनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवर आता उर्फी जावेदने देखील प्रतिक्रिया दिली असून तिने जया बच्चन यांना चांगलेच सुनावले देखील आहे. उर्फी जावेदने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर जया बच्चनचा तो व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले की, तुम्ही कधीच जया बच्चन बनू नका. उर्फी म्हणाली, ‘मी आशा करते की, तुम्ही दोन वेळा पुन्हा पडा, असं त्या म्हणाल्या? प्लिज यांच्यासारखं अजिबात होऊ नका. सगळ्यांची प्रगती व्हावी, असा विचार करावा. जे कॅमेऱ्याच्या मागे लोक आहेत आणि जे पुढे आहेत त्या सर्वांची प्रगती व्हावी. तुम्ही वयानं मोठे आणि सामर्थ्यवान आहात, म्हणून लोक तुमचा आदर करत नाहीत. तर जेव्हा तुम्ही लोकांसोबत आदराने वागता तेव्हाच लोक तुमचा आदर करतील’
याशिवाय उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आणखी एक नोट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे की, ‘मला माझे विचार मांडायला आवडत नाही. पण कधीकधी मी स्वतःवर संयम ठेवू शकत नाही. अर्थात मला माहीत आहे की मी जे करतेय त्याने मला कामाच्या संधीही गमवाव्या लागतील. पण गप्प राहणं आता शक्य नाही. मला वाटतं जे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे नसतात त्यावर बोलणं आपण टाळतो. यावरून तुम्ही कसे आहात हे समजतं.’ या स्टोरी मधून उर्फीने जया बच्चन यांच्या वर्तनावर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा:
Uunchai : मैत्रीवर भाष्य करणाऱ्या ‘ऊंचाई’चा ट्रेलर रिलीज
आलिया भट ‘या’ हॉस्पिटलमध्ये देणार तिच्या बाळाला जन्म, जाणूनघ्या पूर्ण माहिती
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.