spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Congress President Election : मोठी बातमी ! मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

काँग्रेसला अखेर नवा अध्यक्ष मिळाला आहे. ८० वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या नवीन अध्यक्षपदी निवड झाली आहे. खरगे यांनी शशी थरूर यांचा सरळ लढतीत मोठ्या फरकाने पराभव केला. मल्लिकार्जुन खर्गे यांना ७८९७ मते मिळाली, तर शशी थरूर यांना केवळ १०७२ मते मिळाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकूण ९४९७ मतदान झाले. यावेळी गांधी घराण्यातील एकही सदस्य अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील नव्हता. गेल्या २४ वर्षात पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेरचा नेता अध्यक्षपदावर पोहोचला आहे. यापूर्वी सीताराम केसरी असे अध्यक्ष होते. 

हेही वाचा : 

Congress President Election : मोठी बातमी ! मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

Latest Posts

Don't Miss