spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

एकनाथ शिंदे सरकारचा एकनाथ खडसेंना मोठा धक्का; नगरसेवकांची अपात्रता कायम

शिवसेना मध्ये फूट पढल्यानंतर खरी शिवसेना कोणती यावरून दोन्ही गटात वाद सुरु आहे. त्यानंतर अनेक पक्षांचे कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना या पक्ष मध्ये सामील होत आहे. भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतरही राजीनामा न देता राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या दहा नगरसेवकांना जळगाव जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी १८ जुलै २०२० ला एका टर्मसाठी (पाच वर्षे) अपात्र ठरवले होते. अपात्र नगरसेवकांतर्फे या निर्णयाविरोधात नगरविकास विभागाकडे याचिका दाखल केली होती. आता नगरविकास विभागाने १८ ऑक्टोबराल म्हणजे काल या याचिकेवर निर्णय देत ही याचिका फेटाळून लावली. यामुळे खडसे समर्थक नगरसेवकांची अपात्रता कायम आहे. या निर्णयाने प्रचंड खळबळ उडाली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या गटाला आता खंडपीठात याचिका दाखल करण्याचा केवळ पर्याय उरला आहे.

२०१६ च्या निवडणुकीत भाजपच्या कमळ चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, तत्कालीन नगरसेवक अमोल इंगळे ( प्रभाग १ ब ), लक्ष्मी रमेश मकासरे ( प्रभाग १ अ ), सविता रमेश मकासरे ( प्रभाग २ अ ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे ( प्रभाग ६ ब ), मेघा देवेंद्र वाणी (१० अ), अ‍ॅड. बोधराज दगडू चौधरी ( ९ ब), शोभा अरुण नेमाडे ( २० अ ), किरण भागवत कोलते ( २२ ब ) व शैलजा पुरुषोत्तम नारखेडे ( प्रभाग १९ अ ) हे निवडून आले. मात्र त्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच १७ डिसेंबरला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपातून बाहेर पडताना राजीनामा दिला नाही.

यानंतर भाजपच्या नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे २९ डिसेंबरला याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी होवून या दहा नगरसेवकांना जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरवले होते. नगरविकास विभागाच्या निर्णयाविरोधात खंडपीठात दाद मागण्यात येईल, असं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. हा निर्णय सरकारकडून अपेक्षितच होता. त्यामुळे आधीच आम्ही अपिल केले होते, अशीही माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

हे ही वाचा :

ऐन दिवाळीत ‘सीतरंग’ चक्रीवादळाचा धोका; पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईकरांनो सावधान! तीन दिवसांवर दिवाळी आणि मुंबईतून ४०० किलो भेसळयुक्त तूप जप्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss