spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लातूरमधील १६ उद्योजकांना डावलून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांना अवघ्या दहा दिवसांत भुखंड मंजूर; भाजपाचा आरोप

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यावर गंभीर आरोप भाजपनं केले आहे. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. लातूरमधील १६ उद्योजकांना डावलून देशमुखांना अवघ्या दहा दिवसांत भुखंड मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेनं त्यांना ११६ कोटींचा पुरवठा काही दिवसातच कसा काय केला गेला असा सवालही यानिमित्तानं समोर आला आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या देश अॅग्रो प्रा. लिमिटेड या कंपनीला लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोणत्या निकषावर १२० कोटींच्या कर्जाचा पुरवठा केला, आणि त्यामध्ये एवढी तत्परता कशी दाखवली असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. या कंपनीवर आता लातूर बँकेने आक्षेप घेतले आहेत. या बाबत पत्रकार परिषद घेत भाजपाने याचा सखोल तपास करावा अशी मागणी केली आहे. देशमुखांच्या देश अग्रो प्रा लिमिटेड या कंपनीसाठी यंत्रणा गतीने कामाला लागल्याचं दिसून येतंय. अवघ्या काही दिवसात एमआयडीसी भागात या कंपनीला प्लॉट देण्यात आला आहे. त्यासाठी कोट्यवधीचं कर्जही बँकेने उपलब्ध करण्यात आलं आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी में.देश ऍग्रो प्रा.लि. नावाची एक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून देशमुख यांना कृषी प्रक्रियेचा कारखाना सुरु करायचा आहे. हा कारखाना सुरु होण्याआधीच तो वादात सापडला आहे. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी यावर आक्षेप घेतला आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या में.देश ऍग्रो प्रा.लि. कंपनीला लातूर MIDC ने १५ दिवसात भूखंड उपलब्ध करून कसा दिला? असा सवालच मगे यांनी उपस्थित केला आहे. MIDC मध्ये भूखंड मिळवण्यासाठी अनेक लोक वेटिंगलिस्टवर आहेत. आधीपासूनच यांनी अर्ज दिले आहेत. असे असताना रितेश देशमुख यांनाच तातडीने भूखंड उपलब्ध करुन दिल्याचा गुरुनाथ मगे यांनी केला आहे. जाहीर पत्रकार परिषद घेत मगे यांनी हे आरोप केले आहेत.

हे ही वाचा :

पाठीच्या दुखापतीमुळे हरमनप्रीत कौरनची महिलांच्या बिग बॅश संघातून माघार

Diwali Gift : एसटी महामंडळाची मोठी घोषणा, एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांची दिवाळी भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss