spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरे गटाचा मोर्चा अडवल्याने, नवी मुंबई पोलीस आणि खा. राजन विचारे यांच्यात बाचाबाची

नवी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते मोर्चा काढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. या मोर्चासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नवी मुंबईत पोहोचले आहेत. आजूबाजूच्या जिल्ह्यातले कार्यकर्तेही या मोर्चासाठी दाखल झाले होते. ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

हेही वाचा :

Diwali 2022 : दिल्लीत फटाके फोडणाऱ्यांची खैर नाही, ६ महिने तुरुंगवास व इतका दंड भरावा लागणार

मात्र, या मोर्चाला वादाचं गालबोट लागलं. पोलीस आयुक्तालयाच्या गेटवर मोर्चा आला असता मोर्चेकऱ्यांना आतमध्ये जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. त्यामुळे राजन विचारे संतापले. त्यांच्यात आणि पोलिसांत शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे काही काळ वातावरण तापलं होतं. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला. ठाकरे गटाने बेलापूर येथे आधी सभा घेतली. त्यानंतर या मोर्चेकऱ्यांनी पोलीस आयुक्तालयाकडे कूच केली. राजन विचारे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव आणि संजय पोतनीस सहभागी झाले होते. हा मोर्चा पोलीस आयुक्तालयाच्या गेटवर आला. तेव्हा विचारे यांनी आम्हाला आत सोडा असा आग्रह धरला. राजरोसपणे दडपशाही करू नका. आता तरी आत सोडा असं विचारे म्हणाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याशी हुज्जत घातली.

Diwali Gift : एसटी महामंडळाची मोठी घोषणा, एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांची दिवाळी भेट

राजरोज तरी दडपशाही करू नका असे पोलिसांना राजन विचारे यांनी सांगितले. हा गोंधळ पाहून काही वरिष्ठ अधिकारी आले व त्यांना तुम्ही जाऊ शकता असे पोलिसांनी सांगितले. मात्र तुमच्या सोबत गाडीत जे कार्यकर्ते आहेत ते जाऊ शकणार नाहीत असे सांगण्यात आले. मात्र गाडीत नवी मुंबई बेलापूर संघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, ऐरोली अध्यक्ष द्वारकानाथ भोईर असल्याची माहिती दिल्यावर त्यांनादेखील आत सोडण्यात आले. या वादावादीमुळे तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मी उद्धव ठाकरेंसोबत काम करताना त्यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेऊन नव्हतो: मंत्री उदय सामंत

Latest Posts

Don't Miss