spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MCA Election : दिग्गज राजकारणी एकाच मंचावर ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आज होणार असून एमसीएच्या निवडणुकीतली रंगत वाढली आहे. या निमित्ताने काल दि १९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील दिग्गज राजकारणी एकाच मंचावर आलेले दिसले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आज होणार असून एमसीएच्या निवडणुकीतली रंगत वाढली आहे. या निमित्ताने काल दि १९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील दिग्गज राजकारणी एकाच मंचावर आलेले दिसले. या जाहीर कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी परस्परांशी गरवारे क्लबमध्ये चर्चा केल्याचे समजते. ही चर्चा नेमकी कशाबद्दल झाली? याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

एरवी राजकीय हेव्यादाव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी राजकीय मंडळी काल दि १९ ऑक्टोबर रोजी एमसीएच्या (MCA Elections) छताखाली एकीने वावरताना पाहायला मिळाली. एमसीएच्या बैठकीनंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) भेट झाली. आणि यांची भेट म्हणजे नेहमीच चर्चेचा विषय असतो. तर दुसरीकडे बैठकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरही (Milind Narvekar) एकाच गाडीनं रवाना झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

एमसीए निवडणुकीतले उमेदवार आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे शरद पवार यांना निरोप देण्यासाठी त्यांच्या वाहनापर्यंत गेले. मग शरद पवारांनी त्यांना गाडीत बसवले. प्रवासादरम्यान या दोघांची काय चर्चा झाली? याबद्दल प्रचंड कुतुहल आहे. दरम्यान, ही चर्चा तब्बल २० मिनिटे झाली असल्याची माहिती आहे. तर शरद पवारांनी नार्वेकरांना निवडणुक जिंकण्यासाठी कानमंत्र दिल्याची चर्चा आहे. या भेटीगाठीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच मिलिंद नार्वेकर यावेळी सिल्व्हर ओक मध्ये गेले नसल्याची माहिती आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, बरेच दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटलो नव्हतो, दिवाळीला मी जाणार होतो, त्यांनी मला सह्याद्री अतिथिगृहावर भेटायची वेळ दिली, नंतर ते म्हणाले की, एमसीएच्या कार्यक्रमाला मी आहे तर तुम्ही इथेच यावे. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, किट वाटायला थोडासा उशीर झाला. दिवाळी झाल्यावर कीट वाटून उपयोग काय वेळेला महत्त्व आहे. उद्यापासून महाराष्ट्रात किट मिळायला लागेल

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association Election) अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक हेही पवार-शेलार पॅनेलकडून मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत. MCA च्या अध्यक्षपदाची निवडणूक आणखीनच रंगतदार झाली आहे. आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी (MCA President Election) नामांकन अर्ज भरला आहे. त्यानंतर शेलारांच्या विरोधात माजी क्रिकेटपटू संदीप पाटील (Sandeep Patil) यांनी देखील अध्यक्षपदासाठी नामांकन अर्जही भरलाय. तर क्रिकेटच्या राजकारणात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील उडी घेतली आहे.

हे ही वाचा:

अंगडिया खंडणी प्रकरण: न्यायालयाने निलंबित डीसीपीची दुसरी अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली

नेताजींच्या ‘नंतरच्या आयुष्यावर’ काढण्यात येणाऱ्या चित्रपटाच्या विरोधात नेताजी कुटुंबाने दाखल केली जनहित याचिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss