spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : मुंबईत परवान्याशिवाय फटाकेविक्रीवर बंदी!

कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी सण उत्साहात साजरे केले जात आहेत. दिवाळी (Diwali 2022) सण अगदी तोंडावर आला आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, दिव्याचा उत्सव. दिवाळीत मोठ्या प्रमाणाता फटाके (Firecrackers) फोडले जातात.

कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी सण उत्साहात साजरे केले जात आहेत. दिवाळी (Diwali 2022) सण अगदी तोंडावर आला आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, दिव्याचा उत्सव. दिवाळीत मोठ्या प्रमाणाता फटाके (Firecrackers) फोडले जातात. यंदा दिवळीचा उत्साह फारच जास्त असून फटाक्यांच्या खरेदीसाठी नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी केल्याचं दिसतं. परंतु दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईत आता फटाके विकता येणार नाहीत. मुंबई पोलिसांनी परवानगीशिवाय फटाके विकण्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. परवाना नसलेल्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसाच्या आदेशात म्हटले आहे.

मुंबई पोलिसांनी परवानगीशिवाय फटाके विकण्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. परवाना नसलेल्या फटाके विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांच्या आदेशात म्हटलं आहे. हा आदेश १६ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबरदरम्यान लागू राहिल. मुंबई पोलीस उपायुक्त संजय लाटकर (अभियान) यांनी जारी केलेल्या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे की, “जनतेला अडथळा, धोका किंवा नुकसान टाळण्यासाठी मुंबईच्या हद्दीतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी व्यक्तीने फटाके विक्री करु नये. ज्यांच्याकडे फटाके विकण्याचा परवाना आहे, त्यांनाच फटाके विकण्याची परवानगी असेल.

दिवाळीच्या दरम्यान बाजारात फेरफटका मारल्यात अनधिकृत विक्रेत्यांकडून ठिकठिकाणी फटाक्यांची दुकानं लावलेली निदर्शनास येतात. परवाना नसताना करण्यात येणाऱ्या या फटक्यांच्या विक्रीमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय या विक्रेत्यांकडे असलेल्या फटाक्यांच्या सुरक्षिततेबाबतही शाश्वती नसते. या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी विना परवाना फटाके विक्रेत्यांवर बंदी घातली आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की, “मुंबईत रस्त्यावर विनापरवाना फटाके विकण्यास प्रतिबंध आहे. फटाके विकणे, त्याचे प्रदर्शन भरवणे, हस्तांतर करणे, वाहतूक करणे यांवर पोलिसांकडून बंदी घातलेली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर आणि विना परवाना फटाके विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. बेकायदा फटाके विकताना संपूर्ण काळजी घेतली जात नाही, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो किंवा फटाके पेटल्यास आग लागून मोठं नुकसानंही होऊ शकतं.

 बृहन्मुंबईच्या हद्दीत कोणालाही फटाके विकता येणार नाही. तसंच माहुल टर्मिनल क्षेत्र, भारत पेट्रोलिअम, हिंदुस्तान पेट्रोलिअम बीडीयू प्लॉट एरिया, स्पेशल ऑईल रिफायनरी एरियाच्या १५ ते ५० एकर क्षेत्रात रॉकेट किंवा फटाके उडवू नयेत. हा निर्णय १६ ऑक्टोबर २०२२ ते १४ नोव्हेंबर २०२२ या काळात लागू असेल.

हे ही वाचा:

… तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली म्हणतं, शिंदेनी नाव न घेता साधला अप्रत्यक्षपणे निशाणा

MCA Election : दिग्गज राजकारणी एकाच मंचावर ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss