spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईत भास्कर जाधव यांच्याविरोधात भाजपचे बॅनर; ‘शोधून आणणाऱ्यास ११ रुपयांचे बक्षीस…!”

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याविरोधात मुंबईमध्ये (Mumbai) बॅनर लावण्यात आले आहेत. भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्याविरोधात मुंबईमध्ये (Mumbai) बॅनर लावण्यात आले आहेत. भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत. भास्कर जाधव यांना शोधून देणाऱ्याला ११ रुपये बक्षिस देण्यात येईल, असा मजकूर या बॅनरवर आहे. आमदार भास्कर जाधव यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याने भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता हा राणे विरुद्ध जाधव वाद पेटलेला दिसून येत आहे.

मुंबईतील माहीम परिसरात भाजपकडून भास्कर जाधव यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘आपण यांना पाहीलात का ? शोधून आणणाऱ्याला ११ रूपये बक्षिस’ अशा आशयाचे बॅनर मुंबईतील माहीम परिसरात लावण्यात आले आहेत. या बँनरमुळे आता नवा वाद सुरु होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी रात्री जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. शिवाय जाधव यांची सुरक्षा काढून घेतल्यानंतर हा हल्ला झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जात आहे. दरम्यान जाधव विरुद्ध राणे हा वाद काही कमी होण्याचं दिसतं नाहीये.

भास्कर जाधव यांची नारायण राणेंवर जहरी टीका –

ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. याच कारणामुळे १८ ऑक्टोबर रोजी नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार भास्कर जाधव यांनी भाजप तसंच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली होती. सोबतच यावेळी जाधव यांनी राणेंची नक्कल देखील केली होती. “नारायण राणेंचं एकच कीर्तन असतं. मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद दिलं आणि शिवसेना संपली. आहो नारायण राणे.. शिवसेना संपली म्हणताय.. ३९ वर्ष शिवसेनेसाठी काम केलं म्हणता.. मग एवढी वर्षं काय दाढ्या करत होतात? तेव्हा अंधेरी-गोरेगावमध्ये म्हशींचे तबेले होते. शिवसेनेने काहीच केलं नाही, तर ३९ वर्ष काम करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेले तुम्ही काय म्हशी भादरत होता?” असं भास्कर जाधव म्हणाले होते.

हे ही वाचा:

अंगडिया खंडणी प्रकरण: न्यायालयाने निलंबित डीसीपीची दुसरी अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली

नेताजींच्या ‘नंतरच्या आयुष्यावर’ काढण्यात येणाऱ्या चित्रपटाच्या विरोधात नेताजी कुटुंबाने दाखल केली जनहित याचिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss