spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळी भेट; राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा

परतीच्या पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालंय. उभी पिकं पाणी पाण्याखाली गेली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल झाला. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आलं आहे. पिकांची अक्षरशः नासाडी झाली आहे. अशातच शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा सरकारकडे लागलेल्या आहेत. सरकारने आज शेतकऱ्यांसाठी एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. सरकारी मदत कधी केली जाणार याबाबत सातत्याने प्रश्न विचारले जात होते.त्याचं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. भूविकास बॅकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी (Farmers Loan Waiver) करण्यात आली आहे. ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी (Shetkari Karjmafi) करण्यात आली आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे.

७ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी केली जाणार असल्याची माहिती शिंदेंनी केली आहे. परतीच्या पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तातडीने हे सगळे पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

शिंदे सरकार स्थापनेपासूनच शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करत आहे. आम्ही अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले. आताही आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करत आहोत, असं म्हणत शिंदे यांनी कर्जमाफीबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांनी खचू नये. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. मदतीसाठी सरकार तयार आहे, असंही शिंदे म्हणालेत. तसंच राजकीय, सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यात येत असल्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ३० जून २०२२ पर्यंतचे सर्व गुन्हे मागे घतले जाणार आहेत. असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आले. याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. साडेचार हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे. तसंच कालपर्यंत झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे केले जातील, तसंच आपल्याकडे पाठवल्यास लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

दीह महिन्यात सात हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचली असल्याचं फडणवीसांनी सांगितलं. तसंच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेतीच्या नुकसान भरपाईची योजना सॅटेलाईट बेस होणार आहे. ज्यामुळे शेतीत नुकसान झाल्यावर कोणालाही पंचनामा करावा लागणार नाही. उपग्रहाच्या माध्यमातून थेट घटनास्थळाची माहिती मिळेल आणि त्यानंतर ऑटो पायलट मोडवर मदत दिली जाईल. लवकरच अशा प्रकारची सिस्टीम उभारली जाणार आहे.”

हे ही वाचा:

लोकसभा निवडणुकीसाठी मनसे ॲक्टिव, आता बारामती मतदार संघासाठी कंबर कसली

राहुल गांधी आणि रावणात बरच साम्य आहे; अनिल बोंडे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss