Tuesday, September 24, 2024

Latest Posts

Netflix: नेटफ्लिक्सने केली ‘या’ नव्या फिचरची घोषणा

नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेब सीरिजला अनेकांची पसंती मिळत असते. चित्रपट, वेब सीरिज, डॉक्यूमेंट्री इत्यादी पाहण्यासाठी अनेक लोक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मचा वापर करतात.

नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट आणि वेब सीरिजला अनेकांची पसंती मिळत असते. चित्रपट, वेब सीरिज, डॉक्यूमेंट्री इत्यादी पाहण्यासाठी अनेक लोक नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मचा वापर करतात. नेटफ्लिक्सच्या नव्या फिचर्सची युझर्स उत्सुकतेने वाट बघत असतात. नुकतेच नेटफ्लिक्सनं त्याचं ‘प्रोफाइल ट्रान्सफर’ (Profile Transfer) या नव्या फिचरची घोषणा केली आहे.

नेटफ्लिक्सनं त्याचं ‘प्रोफाइल ट्रान्सफर’ (Profile Transfer) या नव्या फिचरची घोषणा केली आहे. या फिचरमध्ये युझर्स त्यांचा डेटा ट्रान्सफर करु शकतात. नव्या फिचरबाबत Netflix वापरकर्त्याला ईमेलद्वारे सूचित करेल. नेटफ्लिक्समध्ये प्रोफाइल ट्रान्सफर करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स नेटफ्लिक्स युझर्सला फॉलो कराव्या लागतील. पाहा स्टेप्स:

  • तुमच्या फोन किंवा ब्राउझरवर नेटफ्लिक्स अँप ओपन करा.
  • अकाऊंट ट्रान्सफर करण्यासाठी, “ट्रान्सफर प्रोफाइल” वर जा.
  • होमपेज वर जा. त्यानंतर ड्रॉपडाउन मेनूमधील आपल्या प्रोफाइल फोटोवर दिलेल्या पर्यायावरील स्टेप्स फॉलो करा.

नेटफ्लिक्स लवकरच बेसिक विथ अँड्स हा नवा स्ट्रीमिंग प्लॅन देखील नेटफ्लिक्स लवकरच लाँच करणार आहे. या प्लॅनमध्ये युझर्स चित्रपट किंवा वेब सीरिज बघतना मध्येच जाहिराती देखील पाहू शकतात. हा प्लॅन काही देशांमध्ये तीन नोव्हेंबर रोजी लाँच केला जाणार आहे. या जाहिराती १५ ते ३० सेकंदांच्या असू शकतात.

नेटफ्लिक्सच्या एका अकाऊंट आणि पासवर्डचा वापर अनेक युजर्स करत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. पासवर्ड शेअरींगमुळे कंपनीच्या सबस्क्रायबर्समध्ये सर्वात मोठी घट झाली आहे. कोरोनामुळे अनेक लोक वर्क-फ्रॉम होम करत आहेत. यामुळे 2020 मध्ये कंपनीचा ग्रोथ रेट वाढला होता. पण अनेक लोक त्यांच्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना सोडून इतर व्यक्तींना देखील त्यांच्या नेटफ्लिक्सच्या अकाऊंटचे डिटेल्स देत होते. त्यामुळे देखील नेटफ्लिक्सचे नुकसान झाले.

नेटफ्लिक्सने एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले की, ‘आज आम्ही प्रोफाइल ट्रान्सफर सुरू करत आहोत. या फिचरद्वारे, युझर्स त्यांची सर्व नेटफ्लिक्स अकाऊंट हिस्ट्री, सेव्ह केलेले गेम आणि इतर सेटिंग्जसह त्यांचे संपूर्ण प्रोफाइल ट्रान्सफर करू शकतात. हे फिचर जगभरातील सर्व Netflix युझर्ससाठी रोल आउट केले जाईल.

हे ही वाचा:

रेल्वेत टीसीची नोकरी देतो सांगून तीन लाख रुपयांचा गंडा

लोकसभा निवडणुकीसाठी मनसे ॲक्टिव, आता बारामती मतदार संघासाठी कंबर कसली

मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळी भेट; राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss