Tuesday, September 24, 2024

Latest Posts

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूकित मतदानाला चांगला प्रतिसाद, आता निकालाची प्रतीक्षा

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक वानखेडे स्टेडियमवर पार पडत आहे. यासाठी ३०० हून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून आतापर्यंत बहुतांस राजकीय गटांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे राजकारणी एकाच मंचावर आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांचं पॅनल एकत्र निवडणूक लढवत आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी भारतीय कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत रंगली आहे. मतदानाची वेळ संपली असून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. ३६८ पैकी ३४३ मतदारांनी बजावला हक्कअसून काही वेळांत म्हणजेच आज सायंकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल समोर येऊ शकतो.

ठाकरे कुटुंबाकडून उद्धव, आदित्य आणि तेजस अशा तिघांना मतदानाचा हक्क होता. पण या तिघांनी म्हणजेच जवळपास संपूर्ण ठाकरे कुटुंबियांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं. भाजप नेते प्रसाद लाड यांनी कि ‘ठाकरे कुटंब संकुचित वृत्तीचे असून इथेही त्यांनी राजकारण आणलं,’ असं म्हटलं आहे. पुढे बोलताना लाड म्हणाले,”ठाकरेंच्या घरातील व्यक्ती मिलिंद नार्वेकर ही निवडणूक लढवत आहेत. तसंच ही निवडणूक मुंबईतील स्थानिक क्रिकेटच्या भल्यासाठी आहे, त्यामुळे आम्ही नार्वेकरांचा प्रचार केला आणि त्यांना आम्ही निवडूनही आणू.”

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी सध्या निवडणूक पार पडत असून यावेळी शदर पवार – आशिष शेलार पॅनलकडून अमोल काळेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे त्याच्या विरुद्ध अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटर संदीप पाटील असणार आहेत. या दोघांच्या आमने-सामने येण्याने क्रिकेटर विरुद्ध राजकीय पार्श्वभूमी असणारी व्यक्ती आमने-सामना आली आहे. दरम्यान काळे यांनी ‘आपण ही निवडणूक कर्तृत्वाच्या जोरावर लढवत आहे, मी राजकारणी नाही किंवा माझ्यावर कोणताही राजकीय वरदहस्त नाही.’ असं आधीच स्पष्ट केलं आहे.

 

हे ही वाचा:

JioBook Price : स्वस्तात लॅपटॉप खरेदी करायचा विचार करताय?, तर नक्की पहा JioBook कमी किंमतीत 

राज्यसरकार करणार मुंबईतील एअर इंडिया बिल्डिंग खरेदी, मंत्रालयाचे विस्तार या वास्तूत होणार

Netflix: नेटफ्लिक्सने केली ‘या’ नव्या फिचरची घोषणा

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss