spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

माझ्याविरुद्ध निवडणुकीसाठी का होईना; सर्व राजकारणी एकत्र आले हे चांगलं आहे- संदीप पाटील

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुकीचा निकाल निकाल समोर आला आहे. पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे एमसीएचे नवे अध्यक्ष झाले असून माजी कसोटीवीर संदीप पाटील पराभूत झाले आहेत. तर, यावेळी अमोल काळे यांना १८१ तर संदीप पाटील यांना १५८ मतं मिळाली आहेत. या निवडणुकीसाठी ३०० हून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे राजकारणी एकाच मंचावर आलेलं पहायला मिळाले या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांचं पॅनल एकत्र निवडणूक लढवल्यानंतर त्यांचा उमेदवार अमोल काळे विजयी झाला आहे. संदीप पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सांगितलं की, अगदी खेळकर वृत्तीने पराभव स्विकारत मी या पुढेही संधी मिळेल तेव्हा मुंबई क्रिकेटसाठी काम करेन अशी प्रतिक्रिया दिली आहे.

संदीप पाटीलांनी सांगितलं की, अपेक्षा आहे त्यांच्याकडून की मुंबई क्रिकेटचं भवितव्य बघतील. सगळे राजकारणी एकत्र राहिले पाहिजे. मुंबई क्रिकेट महत्त्वाचं आहे. फक्त निवडणुकीकरता एकत्र राहणं महत्त्वाचं नव्हतं असा टोला संदीप पाटील यांनी लगावला. चांगली टीम एकत्र राहणं महत्त्वाचं, आता निवडणूक झालेली आहे. मुंबईचं भवितव्य महत्वाचं. संघर्ष क्रिकेटच्या मैदानात असतोच, जिंकणं हारणं मी लहानपणापासून पाहत आलो आहे असंही संदीप पाटील म्हणाले. मुंबई क्रिकेट असोशिएशनचे एकूण ३८० मतदार आहेत. त्यापैकी ५१ क्रिकेटर्स मतदार आहेत, तर ३२९ मतदार क्लबचे प्रतिनिधी आहेत. अमोल काळे १८३ मतांची आघाडी घेत विजयी झाले आहेत.

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार विरुद्ध संदीप पाटील अशी निवडणूक होणार होती. संदीप पाटील शरद पवार गटाच प्रतिनिधीत्व करणार होते. या निवडणुकीआधी एक बैठक झाली. त्यात आशिष शेलार आणि शरद पवार यांचा गट एकत्र आला. आशिष शेलार यांची दोन दिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. यानंतर संदीप पाटील आणि अमोल काळे यांच्यात लढत झाली.

हे ही वाचा :

आनंदाच्या शिधा वाटपावरुन सुप्रिया सुळेंची शिंदे- फडणवीस सरकारला टोला

ब्रिटनमध्ये पुन्हा सत्तानाट्य; आता ‘हे’ बनू शतकतात ब्रिटनचे पंतप्रधान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss