spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Vasubaras Diwali 2022 : दिवाळीचा पहिला दिवस; वसुबारसने झाली दिवाळीची सुरवात

आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras). कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे.

आज दिवाळीचा (Diwali) पहिला दिवस आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस (Vasubaras). कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या कठीण काळानंतर यंदा मात्र, दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. यावर्षी दिवळी सण साजरा करण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. दिवाळीला सणांचा राजा म्हटलं जातं. अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी.

वसुबारस म्हणजे काय?

वसुबारस दिवाळी सुरू होण्याच्या एक दिवस आधी, म्हणजे धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार वसुबारस हा सण आश्विन कृष्ण १२ या दिवशी साजरा केला जातो, हा दिवस गायी आणि वासरांचा सन्मान,पूजा करण्यासाठी ओळखला जातो. ‘वसु’ म्हणजे गाय आणि ‘बारस’ म्हणजे बारावा दिवस, म्हणून वसु बारस हा शब्द आहे.

वसुबारसचा उत्सव सामान्यतः महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये दिसून येतो. दिवाळीची सुरुवात वसुबारसने होते. महाराष्ट्रात वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी म्हटले जाते. गुजरातमध्ये याला ‘बाग बारस’ म्हणतात आणि दक्षिण भारतात लोक ‘नंदिनी व्रत’ म्हणून हा दिवस साजरा करतात.

वसुबारसचे महत्व :

आजही भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाचा मोठा भाग आजही शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवतो. म्हणून ग्रामीण भारतातील अनेक भागांमध्ये, लोक त्यांच्या गायी आणि वासरांची पूजा करून हा दिवस साजरा करतात. कारण त्यांच्यासाठी गाय हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. घरातील महिला गोपूजा आणि श्रीकृष्ण पूजा करतात. या दिवशी धनाची देवी म्हणून ओळखली जाणारी लक्ष्मी गाईचे रूप धारण करते, म्हणून लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी गाईची पूजा करतात अशी देखील आख्यायिका आहे.

वसुबारस व्रत :

या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप आणि ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात आणि गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सुवासिनी बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वारसे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या ‘नंदा’ नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

वसुबारस/गोवत्सद्वादशी
संध्या.६.४५ ते ८.१५ गाईचे पूजन करणे.

– श्री रवींद्र भगवान पाठक गुरुजी , ठाणे 

हे ही वाचा:

Diwali 2022 : दिवाळीत किल्ला का बांधतात ? जाणून घ्या…

Diwali 2022 : दिवाळीत बनवा घरच्या घरी स्वादिष्ट नानकटाई…

Diwali 2022 : दिवाळीनिमित्त सजली बाजारपेठ, आकाशकंदील,रांगोळी, दिवे खरेदीसाठी ग्राहकांची तुफान गर्दी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss