spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Yogi Adityanath : लोकसंख्या नियंत्रण कायद्यापासून ते धर्मांतराच्या मुद्द्यावर, यूपीमध्ये भाजप सक्रिय

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल गुरुवारी प्रयागराजमध्ये संघप्रमुख मोहन भागवत(Mohan Bhagwat) यांची भेट घेतली. त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, लोकसंख्या आणि धर्मांतराचा वाढता असमतोल या मुद्द्यावर दोघांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाली. मात्र, याशिवाय काही मुद्दे आहेत, ज्यावर भाजप पुढील लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे.

Diwali 2022 : राज ठाकरेसह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील मनसेच्या दीपोत्सवासाठी येणार एकत्र

मात्र, गुरुवारी सीएम योगी (Yogi Adityanath) आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या भेटीनंतर यूपीमध्ये लोकसंख्या नियंत्रण कायद्याची चर्चा सुरू झाली. पण याशिवाय अनेक मुद्द्यांवर भाजप सध्या काम करत आहे. राज्यातील योगी सरकार ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतलेल्यांची आकडेवारी आधीच गोळा करत आहे. याशिवाय, सत्ताधारी भाजप सरकार आता १८ ओबीसी जातींना एससीमध्ये समाविष्ट करण्याचा विचार करत असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा : 

Diwali 2022 : मनसेकडून दीपोत्सवाचं आयोजन; राज ठाकरेंनी केलं पत्राद्वारे मुंबईकरांना आवाहन

या सर्वांशिवाय राज्यात गत काळात जात जनगणनेचीही चर्चा सुरू झाली आहे. खरं तर, एका प्रेस कॉन्फरन्समध्ये डेप्युटी सीएम केशव प्रसाद मौर्य म्हणाले होते, “माझा प्रश्न त्या लोकांशी आहे. पण आम्ही त्याच्या समर्थनात आहोत, विरोधात नाही. मी जात जनगणनेच्या विरोधात नाही, पण मी. मी समर्थनात आहे. ते व्हायलाच हवे, त्यात काहीही चुकीचे नाही.” याशिवाय ओमप्रकाश राजभर यांनीही अनेकवेळा ही मागणी केली आहे.

उत्तर प्रदेशातील ७५ जिल्ह्यांमध्ये मदरशांचे सर्वेक्षण आणि विकासाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, सुमारे ७,५०० अपरिचित मदरसे ओळखले गेले आहेत. मात्र, १५ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षणाचा संपूर्ण अहवाल शासनस्तरावर येणार आहे. त्यानंतरच संपूर्ण स्पष्ट आकडेवारी समोर येईल.

Vasubaras Diwali 2022 : दिवाळीचा पहिला दिवस; वसुबारसने झाली दिवाळीची सुरवात

यानंतर योगी सरकारचा सर्वाधिक भर विकासकामांवर आहे. स्वत: मुख्यमंत्री गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक जिल्ह्यात फिरत आहेत. यावेळी ते तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याबरोबरच विकासकामांची आढावा बैठकही घेत आहेत. प्रत्येक काम वेळेत पूर्ण व्हावे, यावर सरकारचा भर आहे.

Latest Posts

Don't Miss