spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमश्चक्री सुरु…

'बिग बॉस मराठी'चा खेळ म्हणजे टास्क, वाद, भांडण आणि राडे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन दोन आठवडे उलटले असून आता खरी मजा घेऊ लागली आहे.

‘बिग बॉस मराठी’चा खेळ म्हणजे टास्क, वाद, भांडण आणि राडे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात होऊन दोन आठवडे उलटले असून आता खरी मजा घेऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय, कोण मनापासून साथ देतय याची प्रचिती स्पर्धकांना येऊ लागली आहे. आता तिसऱ्या आठवड्यात कोण कॅप्टन होणार याचे वेध सर्वांना लागले आहे. त्यासाठी एक भन्नाट कॅप्टीन्सी कार्य बिग बॉस ने सर्वांना दिले आहे. या टास्कच्या दरम्यान पण खूप राडा होणार आहे. याच कार्यादरम्यान अपूर्वा नेमलेकर दोन स्पर्धकांविषयी काही कमेंट करताना दिसणार आहे.

‘बिग बॉस मराठी 4’च्या दसरा स्पेशल एपिसोडपासून कॅप्टन निवडीच्या टास्कला सुरुवात झाली होती. या कॅप्टन्सीच्या रेसमध्ये समृद्धी जाधवने बाजी मारली असून, ती ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील पहिली महिला कॅप्टन झाली आहे. ‘बिग बॉस मराठी सीझन 4’चा खेळ दुसऱ्या आठवड्यात पोहोचला असून, सर्वच स्पर्धकांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या आठवड्यातील साप्ताहिक कार्य पार पाडताना स्पर्धक बरेच आक्रमक होताना पाहायला मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 यावेळी पहिल्या फेरीत खेळताना किरण माने आणि बिग बॉस मराठी सीझन 4ची पहिली कॅप्टन समृद्धी जाधव ही या खेळातून बाहेर पडली. यावेळी समृद्धी जाधव हिने मनाचा मोठेपणा दाखवून कॅप्टन असल्यामुळे खेळातून स्वतःच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बिग बॉस यांच्या आदेशावरून दोघांनाही दुसऱ्या फेरीसाठी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले.

या दरम्यान अपूर्वा त्रिशूलला सांगताना दिसणार आहे की, ‘त्यांनी सगळं उचललं असेल आणि फेकलं असेल शक्तीच्या बळावर, पण युक्ती देखील लागते जी त्यांच्याकडे नाहीये’. यावर मेघाचे म्हणणे आहे की, ‘आपली कॉपी करायला गेले, तुम्हांला का नाही सुचतं आधी…’ त्यावर अपूर्वाचे म्हणते की, ‘असं केलं आणि गणले.. कारण प्लॅन माहितीच नाहीये’. तेजस्विनी टीमला सांगताना दिसणार आहे, ‘मेघा ताई ज्याप्रकारे भांडतात, काही बघतच नाही त्या…’

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 यावेळी संचालक असलेल्या समृद्धी जाधव आणि किरण माने यांच्यात देखील वादावादी झाली. या वेळी समृद्धी जाधव हिने स्वतःचा मुद्दा ठामपणे किरण माने यांच्यासमोर मांडून एका निष्पक्ष संचालकाची भूमिका अत्यंत उत्तम रित्या पार पडली. समृद्धी जाधव हिने मुद्देसूदपणे आपली मते मांडून एक चांगली स्पर्धकच नाही, तर एक चांगली कॅप्टन असल्याचेही दाखवून दिले. आक्रमकते बरोबरच समृद्धी हिचे हळवे मनदेखील प्रेक्षकांना दिसून आले. साप्ताहिक कार्य सुरु होण्याआधी ज्या वेळी विकास हा बाकी स्पर्धकांकडून टार्गेट होताना दिसत होता, त्यावेळी समृद्धी हिने विकास यांना प्रोत्साहन देऊन एक चांगली सदस्य असल्याचे दाखवून दिले.

टास्क दरम्यान अक्षय, समृद्धी आणि अपूर्वामध्ये चर्चा रंगली असून, अमृता धोंगडे आणि यशश्रीबद्दल चर्चा सुरु आहे. अपूर्वा अक्षय आणि समृद्धीला सांगताना दिसणार आहे की,’अमृता प्रचंड चिडली आहे, हे लक्षात ठेवा. यशश्री पण…. दोघीपण विमझिकल आहेत.’ या सगळ्या ड्रामानंतर आज टास्कमध्ये पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अजून घरात काय काय घडले, हे जाणून घेण्यासाठी ‘बिग बॉस मराठी 4’ पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

 हे ही वाचा : 

जी कारवाई व्हायची असेल ती होऊ द्या; रोहित पवार

उत्सवाच्या प्रवाहात घेऊन जाणारे गोदावरी चित्रपटाचे गाणे “खळ खळ गोदा” प्रेक्षकांच्या भेटीस

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss