spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कृष्णा-अर्जुन जिहादच्या वक्तव्यावर शिवराज पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणतात- ‘मी फक्त हे विचारले’

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विधानाने आता मोठा वाद निर्माण झाला आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, असं वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांनी आता आपल्या विधानाचं स्पष्टीकरण दिलं आहे. गीतेची तुलना जिहादशी केल्याने आता ते राजकीय वादात सापडले आहेत. माध्यमांशी संवाद साधतांना वक्तव्याचा सप्ष्टीकरण देतांना दिसले. हिंदू धर्माच्या अनुषंगाने जिहाद काय आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केले आणि सांगितले की महात्मा गांधींची हत्या जिहाद मानली जाईल.

आपल्या या वादग्रस्त विधानावर चाकूरकर यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, “कुराण शरीफ वाचा, त्यानंतर बोललो मी. कुराणात म्हटलंय की जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की खूप मोठ्या संख्येने देव नाहीत. देव एकच आहे, त्याचं कुठलंही रुप नाही, रंग नाही, आकार नाही. म्हणून ते मूर्ती लावत नाहीत. ख्रिश्चनांमध्येही हीच कल्पना आहे. त्यानंतर ज्यू धर्मातही हीच कल्पना आहे. देव आहे पण त्याची मूर्ती नाही करू शकत. कारण गीतेतच सांगितलंय की देवाचं रुप नाही, आकार नाही. मग देव आहे काय? देवाने हे विश्व बनवलं आहे”.

भाजपने म्हटले आहे की हे स्पष्टीकरण केवळ त्यांच्या म्हणण्याचा बचाव आहे. “श्रीकृष्णाच्या संदेशाची अर्जुन-पवित्र गीता यांची जिहादशी तुलना केल्यानंतर आता शिवराज पाटील स्पष्ट माफी मागण्याऐवजी आपल्या विधानाचा बचाव करत आहेत. शिवराज पाटील यांनी आपल्या वक्तव्याचा अर्थ काय ते स्पष्ट करताच ते म्हणाले की, हिंदू धर्मात जिहाद म्हणजे चांगल्या माणसाची हत्या आहे. “तुम्ही महात्मा गांधींना मारले तर तो जिहाद आहे,” असं शिवराज पाटील यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

चक्रीवादळ सितरंग: सोमवारपासून या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Bigg Boss Marathi 4 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमश्चक्री सुरु…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss