spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mumbai Police : मुंबईत १ ते १५ नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी लागू, पोलिसांची नवी मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा धोका लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यांच्या १ ते १५ तारखेपर्यंत काही महत्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. कलाम १४४ (जमावबंदी)सह मुंबई पोलिसांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याच्या विविध एजन्सींच्या सूचना लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे. भारतीय दंड संहितेचे कलम १४४ (आयपीसी) सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास प्रतिबंध करते. च्या कलम ३७ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.

हेही वाचा : 

राऊतांप्रमाणे अनिल देशमुख यांची दिवाळी सुद्धा तुरुंगात, न्यायालयाने जमीन अर्ज फेटाळला

देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील शांतता, कायदा आणि सुव्यवस्था, दंगल, मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती आणि विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. जमावबंदीसह मुंबई पोलिसांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हा आदेश १ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता ते १५ नोव्हेंबर २०२२ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू करण्यात आला आहे. हा आदेश १५ दिवसांसाठी आहे, जो पुनरावलोकनानंतर पुढे वाढवला देखील जाऊ शकतो.

Sanjay Raut : खा.संजय राऊतांच्या यंदा दिवाळी फराळ कोठडीतच, अजूनही दिलासा नाहीच

मुंबई पोलिसांकडून अलर्ट

मुंबईत शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता आहे. यामुळे मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका असल्याने पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. दिवाळी सण असल्याने बाजारपेठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. यामुळे गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या १५ दिवसांमध्ये कोणत्याही सभा आणि मेळाव्यात लाऊडस्पीकर, डीजे, वाद्ये वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Kantara : ‘कांतारा’ चित्रपटपाहून कंगना झाली इम्प्रेस; केला व्हिडिओ शेअर

Latest Posts

Don't Miss