spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुकेश अंबानीच्या पुत्राने घेतली उद्धव ठाकरेंची भेट

प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी ‘मातोश्री’वर पोहचले होते. अनंत अंबानी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीच कारण अद्याप समोर आलं नाही आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे तिन्ही नेते मनसेच्या दिपोत्सवाच्या कार्यक्रमावेळी एकत्र जमले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दीपोत्सवाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर ११.३० च्या सुमारास ते तेथून बाहेर पडले. अनंत अंबानी आणि उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल तीन तास चर्चां झाली आहे. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

राज्यातील सत्तासंघर्षानंतर गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यात आता अनंत अंबानी सुद्धा ‘मातोश्री’वर दाखल झाले होते. या दोन्ही भेटीचा तपशील समोर आला नाही. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. एक महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी या दोघांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीबद्दल अत्यंत गुप्तता बाळगण्यात आली होती. या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी साधारण तासभर चर्चा केल्याची माहिती आहे. मध्यरात्र उलटल्यानंतर मुकेश अंबानी मुलासह वर्षा बंगल्यातून बाहेर पडले होते.

हे ही वाचा :

कंत्राटी बेस्ट कर्मचारी संपावर; दिवाळी गोड करण्याची मागणी

समृध्दी महामार्गाशी ऑरिक सिटीला जोडल्यास गुंवणूकीत नक्कीच वाढ होणार; उद्योगमंत्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss