spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चुनाभट्टी येथे दरड कोसळून तीन जण जखमी, बचाव कार्य सुरू

चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरात एका चाळीतील दोन घरांवर सकाळी ११च्या सुमारास दरड कोसळल्याची दुर्घटना घडली.

मुंबई : गेले दोन दिवसांपासून मुंबई सह उपनगरामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य देखील पाहायला मिळत आहे. चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरात एका चाळीतील दोन घरांवर सकाळी ११च्या सुमारास दरड कोसळल्याची दुर्घटना घडली.

या दुर्घटनेमध्ये एका महिलेसह दोन जण जखमी झाले आहेत. नागरिकांनी अग्निशम दलाला संपर्क साधताच तत्काळ अग्निशम दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू असून जखमी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असून स्थानिकांना चाळ रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले.

घाटकोपर मध्ये एका घरावर कोसळली दरड

घटनेत प्रकाश सोनवणे वय वर्ष 40, शुभम सोनवणे वय वर्ष 15, सुरेखा वीरकरवय वर्ष 28 ही जखमींची नावे आहेत. चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरात मागच्या बाजूला डोंगर आहे. पावसाच्या मोठ्या झरी मुळे डोंगरातील काहीसा भाग हा चाळीवर कोसळला आणि ही दुर्घटना घडली.

गेले दोन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून मुंबईची मुंबई झाली आहे मुंबईतील महानगरपालिकेच्या नालेसफाई चे काम योग्यरीत्या न केल्याचा नागरिकांनी दावा केला आहे.

पुढच्या पोस्टल कॉलनी मध्ये देखील पाणी साचले आहे नागरिकांना गुडघ्या एवढ्या पाण्यातून आपली वाट शोधत जावे लागत आहे चाळीच्या व इमारतीच्या तळमजल्यामध्ये पाणी साचले आहे.

एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष कार्यालयात न आल्याने किशोरी पेडणेकर यांनी केली खंत व्यक्त

Latest Posts

Don't Miss