spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : नरक चतुर्दशीच्या द्या मंगलमय शुभेच्छा…

दिवाळी हा असा सण आहे की या सणामध्ये पाच सण साजरे करायला मिळतात. यावेळी लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी एकाच वेळी आले आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी १ अंघोळ केली जाते. आणि त्या दिवशी अभ्यंगस्नान आणि कारीट फळ फोडण्याची प्रथा आहे. या दिवशी दिवाळीची पहिली पहाट देखील मोठ्या प्रमाणात साजरी करतात. या दिवशी नवीन कपडे घालून एकमेकांना शुभेच्छा देतात आणि फराळाला आमंत्रण करतात. तर आज आम्ही तुम्हाला या लेख मधून नरक चतुर्दशीच्या मंगलमय शुभेच्छा बद्दल सांगणार आहोत.

हे ही वाचा : Diwali 2022 : दिवाळीत किल्ले कसे बांधायचे? घ्या जाणुन

 

नरक चतुर्दशी हा सण यंदा २४ ऑक्टोबर २०२२ रोजी आहे . संध्याकाळी ६. २८ मिनिटाचा पूजेचा मुहूर्त आहे. नरकचतुर्थीच्या दिवशी नरकासुराची पूजा केली जाते. यादिवशी कोकणात पायाखाली “कारेटं” ठेवून अंघोळ केली जाते. आणि आई – वडिलांचे दर्शन घेतले जाते. पहाटे दिवे लावले जातात. रांगोळी काढल्या जातात. नरकचतुर्थी या सणादिवशी दुःख दारिद्रय विसरून जाणे ही प्रथा आहे. तसेच या दिवशी यमाला दीप देण्याची प्रथा देखील आहे आणि या दीपला यम दीप असे बोले जाते.

दिवाळीची पहात घेऊन आली दिवाळी,
दुष्ट प्रवृत्ती होऊदे नष्ट, घरात सुख समृदी नांदो,
हीच ईश्वर चरणी प्राथना,
तुम्हाला नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा।।

तुमच्या आयुष्यातील सर्वे दुःख दारिद्र दूर होऊदे,
तुमचे हे वर्ष आनंदाने आणि उत्साहाने जाऊदे,
तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊदे,
नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा।।

लक्ष्मी माता तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना नेहमी वाईट नजरे पासून दूर ठेवेल,
अशी तुम्हाला शुभ कामना,
तुम्हाला नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा।।

खऱ्याच खोट्यावर नेहमीच प्रभाव असावा,
अन्यायाचा प्रतिकार करण्याकचे बळ तुम्हाला लाभो,
आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो,
तुम्हाला स्वर्गसुख नित्य लाभो,
ही दिवाळी तुम्हा सर्वांना,
सुखसमृद्धी आणि आनंदाची जावो,
नरक चतुर्दशीच्या तुम्हाला मंगलमय शुभेच्छा।।

भगवान श्री कृष्णाने नरकासुराचा वध केला,
त्याच प्रमाणे आपल्या जीवनातील देखील,
दुःखाचा नाश होऊदे,
तुम्हाला नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा।।

हे ही वाचा :

दिवाळीत रेल्वेचा झटका, प्लॅटफॉर्म तिकीट पाच पटीने वाढलं! प्लॅटफॉर्मवर जावं की जाऊ नये?

 

Latest Posts

Don't Miss