spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवाजी पार्कमध्ये मागील १० वर्षांपासून रोषणाई होत आहे, यात नवे काही नाही; किशोरी पेडणेकर

२१ ऑक्टोबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानामध्ये दीपोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर आल्याचे दिसून आले. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते दीपोत्सवाच्या निमित्ताने एका मंचावर आले होते. दरम्यान, हे तिन्ही नेते एकत्र आल्यानंतर आगामी काळात महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण उदयास येणार का? असे विचारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मागील १० वर्षांपासून शिवाजी पार्कवर रोषणाई होते, त्यात काहीही नवे नाही, असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.

दादर मधल्या “शिवाजी पार्कमध्ये मागील १० वर्षांपासून रोषणाई होत आहे. यात नवे काही नाही. मात्र यावेळी तीन वेगवेगळ्या पक्षाचे नेते एका मंचावर आले. पण मी नेहमीच म्हणते की घर फिरलं की घराचे वासे फिरतात. इथे मात्र वासे अगोदर फिरले आहेत. आता घर फिरवत आहेत,” अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी मागील दहा वर्षांपासून आमची शिवाजी पार्कवरील दीपोत्सवात येण्याची इच्छा होती, मात्र यायला मिळाले नाही, असे विधान केले होते. त्यावरही किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “दहा वर्षांमध्ये यायला भेटले नाही, हे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मात्र मागील दहा वर्षात नेमके काय मिळवले, हे त्यांनी सांगितले नाही. मतदारांना हे किती पटत आहे, हे दिसत आहे. त्यांना जे म्हणायचे आहे ते म्हणून देत. मी त्यावर काहीही बोलणार नाही. त्यांना काय टोलेबाजी करायची ती करू द्या,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

“राजकारणाचे एवढे अध:पतन होईल असे कोणालाही वाटले नव्हते. नगरसेवक फुटणे, आमदार फुटणे, गट फुटणे हे जगात तसेच देशातही घडते. मात्र महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीमुळे तरुण पिढीने, सुशिक्षित लोकांनी राकारणात येऊ नये, असे चित्र निर्माण झाले आहे. मात्र या समजाला आदित्य ठाकरे नक्कीच छेद देतील. त्यांच्या चांगल्या वागणुकीने ते चांगला आदर्श निर्माण करत आले आहेत,” असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी आदित्य ठाकरे यांची सुत्ती केली.

हे ही वाचा :

Bigg Boss 16 : विकेंड वारमध्ये करण जोहर संतापला, ‘या’ सदस्याची घेतली चांगलीच हजेरी

दिवाळीत रेल्वेचा झटका, प्लॅटफॉर्म तिकीट पाच पटीने वाढलं! प्लॅटफॉर्मवर जावं की जाऊ नये?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss