spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्धव ठाकरे हे परतीच्या पावसाने (Heavy Rain) केलेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. परतीच्या पावसाने औरंगाबादसह मराठवाड्यातील शेतीचे नुकसान झाले आहे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे राजकीय नजरेतूनही पाहिले जात आहे. शिंदे यांनी केलेल्या बंडात औरंगाबादमधील शिवसेनेचे आमदार सामील झाले आहेत. शिवसेनेसाठी औरंगाबाद हा महत्त्वाचा जिल्हा आहे. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेलादेखील औरंगाबादमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला होता. औरंगाबाद महापालिका निवडणुकही जाहीर होण्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेला उभारणी देण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याकडे पाहिले जात आहे.

परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबादचा दौरा करणार आहेत. उद्या, रविवारी दुपारी १२ वाजता उद्धव ठाकरे यांचा पाहणी दौरा सुरू होणार आहे. यावेळी ठाकरे हे काही शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करून ठाकरे शेतकऱ्यांसाठी पॅकेजची मागणी करण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. शेतकरी हतबल झाल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. गंगापूर तालुक्यातील बुट्टेवडगाव परिसरात तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसुदृश पाऊस झाला होता. त्यामुळे शेतात गेल्या चार दिवसांपासून गुडघ्याला लागेल इथपर्यंत पाणी तुंबले आहे. पीक पाण्याखाली गेल्याने मोठं नुकसान झाले आहे. मागील दोन महिन्यात जवळपास 32 दिवस पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गंगापूर तालुक्यातील बुट्टेवडगाव परिसरात तीन दिवसांपूर्वी ढगफुटीसुदृश पाऊस झाला होता. त्यामुळे शेतात गेल्या चार दिवसांपासून गुडघ्याला लागेल इथपर्यंत पाणी तुंबले आहे. पीक पाण्याखाली गेल्याने मोठं नुकसान झाले आहे.

परतीच्या पावसाने मोठं नुकसान केलं असून शेतकरी हवालदिल झाला आहे. काढणीला आलेले पीक हातातून गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. याआधीच झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे आणखी नुकसान झाले आहे.

हे ही वाचा:

Ola Electric Scooter Launched : Ola चा दिवाळी धमाका! कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

Diwali 2022 : दिवाळीनिमित्त धनत्रयोदशीला सोन्याचे दागिने खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा! फसवणुकीपासून सुरक्षित रहा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss