spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार?, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया म्हणाल्या, हा तर भाजपचा…

मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव जरी असले तरी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते सातत्यानं चर्चेत आहेत. एकीकडे उद्धव ठाकरे हे अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका करत आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच गटातील मिलिंद नार्वेकर यांनी २२ ऑक्टोबर रोजी केलेलं ट्वीट राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं. मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या ट्वीटमुळे आता मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार आहेत का? असा प्रश्न पुन्हा विचारला जाऊ लागला. त्यावरुन राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडण्यास सुरुवात झालीय.

Diwali 2022 : दिवाळीनिमित्त धनत्रयोदशीला सोन्याचे दागिने खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा! फसवणुकीपासून सुरक्षित रहा

मिलिंद नार्वेकर ठाकरे गटात नाराज असल्याचं मी सुद्धा ऐकतो आहे, असं विधान भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या सर्व चर्चांचा ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला आहे. मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार हा भाजपने सोडलेला फुसका बार आहे, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

हेही वाचा : 

Ola Electric Scooter Launched : Ola चा दिवाळी धमाका! कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च

सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. दिवाळी असल्याने काही लवंगी मिरच्या तडतड करत आहेत. काही छोट्या छोट्या फुलबाज्या सुध्दा आपली चमक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही फुसके बार देखील होत आहेत. मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार हा तोच फुसका बार आहे. जो भाजपने सोडला आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

भाजपकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाने सातत्याने फुसका बार सोडला जात आहे. पण भाजपचा हा फुसका बार काही केल्या वाजत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

बंडखोरीनंतरही ठाकरेंसोबतच

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर उघड-उघड शिंदे-नार्वेकर यांच्यातील भेटींनी अनेकदा चर्चांना उधाण आलं. पण शिंदे गटात जाण्याच्या चर्चा नार्वेकरांनी नेहमीच फेटाळून लावल्या. गुलाबराव पाटील यांनी एकदा नार्वेकर यांच्याबाबत सूचक वक्तव्यही केलं. नार्वेकर शिंदे गटात जातील, असे योगायोग जुळवून आणण्याचे प्रयत्नही झाल्याचं बोललं गेलं. पण नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या गटात राहिले.

शिवाजी पार्कमध्ये मागील १० वर्षांपासून रोषणाई होत आहे, यात नवे काही नाही; किशोरी पेडणेकर

उद्धव ठाकरेंचे पीए ते शिवसेनेचे सेक्रेटरी असा प्रवास केलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची आता पुन्हा चर्चा होतेय. निमित्त त्यांनी केलेल्या अमित शाहा यांना दिलेल्या शुभेच्छांच्या ट्वीटचं आहे. पण त्याआधी घडलेल्या 3 महत्त्वाच्या घडामोडी मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांची मैत्री किती घट्ट आहे, हे अधोरेखित करणाऱ्या ठरल्यात.

Latest Posts

Don't Miss