spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Rohit Sharma: भारताच्या राष्ट्रगीतादरम्यान कर्णधार रोहित शर्मा भावूक; पहा Video

मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी-20 विश्वचषक सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मेलबर्नमध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी-20 विश्वचषक सामना खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना टीम इंडियाचे सर्व खेळाडू उत्साहात दिसत होते. त्याचवेळी कर्णधार रोहित भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. रोहित कसेतरी आपल्या भावनांवर आवर घालताना दिसला. रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

राष्ट्रगीत सुरु असताना रोहित शर्मा डोळे बंद करुन उभा होता. त्याने आकाशाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळे भाव होते. त्याने कसंबसं स्वत:ला इमोशनल होण्यापासून रोखलं. पण अखेरीस रोहितच्या डोळ्यात पाणी दिसलच. रोहित शर्माचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

 भारत-पाकिस्तान सामन्याच्या आधी जेव्हा दोन्ही संघाचं राष्ट्रगीत सुरू होतं, तेव्हा मेलबर्न क्रिकेट स्टेडियममधील एक लाखांहून अधिक प्रेक्षकांसमोर खेळाडू उभे होते. जेव्हा भारताचे राष्ट्रगीत सुरू झालं, तेव्हा संपूर्ण स्टेडियमधील प्रेक्षक आपपल्या जागेवर उभे झाले. त्यावेळी भारतीय संघाचे सर्व खेळाडू देशाचं राष्ट्रगीत म्हणत होते. राष्ट्रीत संपणार इतक्यात कॅमेरा रोहित शर्मावर गेला. त्यावेळी रोहितच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळालं.

संघ

भारताची प्लेईंग इलेव्हन:
रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन:
बाबर आझम (Babar Azam), मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.

हे ही वाचा :

IND vs PAK T20 : अर्शदीपने पहिल्याच चेंडूवर केली बाबर आझमची शिकार

IND vs PAK T20 World Cup: नाणेफेक जिंकत भारताचा गोलंदाजीचा निर्णय

IND vs PAK: मेलबर्नच्या मैदानात रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; मेलबर्नमधला काय आहे हवामान अंदाज ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss