spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs PAK T20 World Cup: सामना जिंकल्यानंतर रोहितने विराट कोहलीला चक्क खांद्यावर उचललं आणि….; व्हिडिओ होतोय वायरल

खरंतर क्रिकेटच्या विश्वामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेला सामना हा क्रिकेट विश्वातील क्रिकेट प्रेमींचा सगळ्यात लोकप्रिय सामना असा मानला जातो. त्यात आज आस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये (Melbourne) भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा एक रोमांचक सामना पहायला मिळाला या सामन्याने अखेर अखेरच्या चेंडूपर्यंत क्रिकेटचा थरार आणि क्रिकेट प्रेमींचा जीव स्वतःत सामावून ठेवला होता. तसेच जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचे श्वास रोखले गेले होते. अखेरच्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) चौकार मारुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला. खरंतर या मॅचमध्ये पाकिस्तान चांगल्या स्थितीमध्ये होता. पण विराट कोहलीच्या(Virat Kohli) फलंदाजिने संपूर्ण साम्याची परिस्थितीच बदलून टाकली .

टीम इंडियाला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी १ धावांची गरज होती. आर अश्विनने सिंगल घेताच नॉन स्ट्रायकरवर उभ्या असलेल्या विराटची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. विराट कोहली उडी मारून हा विजय साजरा करताना दिसला. टीम इंडियाच्या या विजयाने रोहित शर्माला इतका आनंद झाला की, त्याने चक्क विराट कोहलीला आपल्या खांद्यावर उचलून घेतलं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा डगआउटमधून धावत आला आणि त्याने विराट कोहलीला खांद्यावर उचलून घेतले. रोहित शर्मा आणि विराट कोहली याआधी क्वचितच असे सेलिब्रेशन करताना दिसले आहेत.

रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. पाकिस्तानने २० ओव्हर्समध्ये ८ बाद १५९ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची स्थिती ४ बाद ३१ होती. अनेकांनी अपेक्षा सोडून दिली होती. पण विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने मॅच सोडली नाही.

दोघे जिद्दीने लढले आणि अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. विराटने ५३ चेंडूत नाबाद ८२ आणि हार्दिक पंड्याने ३७ चेंडूत ४० धावा केल्या. फटकेबाजीची सुरुवात हार्दिक पंड्याने करुन दिली. पण नंतर रंगात आला, तो विराट कोहली. विराट जबरदस्त खेळला. १ चेंडूत १ रन्सची गरज असताना तो नॉन स्ट्राइकवर होता.अश्विनने चौकार मारुन विजय मिळवून देताना टीम इंडियाने सेलिब्रेशन सुरु केलं. ऐतिहासिक मेलबर्नच्या मैदानात हा विजय मिळवला आहे. दीर्घकाळ लक्षात राहील, असा हा विजय आहे.

 

हे ही वाचा :

नवी मुंबई महापालिकेकडून महिलांना आर्थिक पाठबळ

बिग बी च्या पायाला टाके; सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती

MPSC मध्ये पाच हजार मुलांमधून कल्याणच्या अभिषेकचा प्रथम क्रमांक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss