spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात ‘दिवाळी पाहाट’ निमित्त उपस्थित, ठाणेकरांच्या जल्लोष द्विगुणीत

कोविड काळातील दोन वर्षानंतर नव्या सरकारने कोरोना निर्बंध शिथिल केल्यामुळे सर्वच भारतीय सण मोठ्या जल्लोषात साजरे होत आहेत. दिवाळी हा सण दोन वर्षानंतर उत्साहात साजरा करण्यात येत असुन दिवाळी पहाट च्या निमित्ताने आज सोमवारी सकाळी ठिकठिकाणी होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तरुणाई सज्ज झाली आहे. ठाणे शहरात तर तब्बल अकरा ठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम होत आहेत. यंदा दिवाळी पहाटच्या निमित्ताने संपुर्ण तलावपाळी परिसराला झळाळी देण्यात आली असुन डिजे व ढोल ताशांच्या गजरात मोठ्या प्रमाणात युवावर्ग एकवटली आहेत.

दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच जोरदार फटकेबाजीही केली. टीम इंडिया जिंकली हा आनंदाचा क्षण आहे. तोही उत्सव आहेच. तुम्ही पाहिलं असेल मेलबर्नमध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकली. स्टेडियममध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकवण्यात आले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा : 

Aurangabad :ठाकरेंनंतर शरद पवार यांचा दौरा सुरु असतानाचं, औरंगाबादमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

कालची मॅच जिंकली. तशीच आम्ही तीन साडेतीन महिन्यापूर्वी एक मॅच खेळलो आणि जिंकली. या देशाने आणि महाराष्ट्राने पाहिली, अशी फटकेबाजी मुख्यमंत्र्यांनी करताच उपस्थितांनी त्यांना हसून दाद दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कामाचाही आढावा घेतला.

लोाकांच्या मनातील राज्य आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही आल्या आल्या आपली संस्कृती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. विकासाबरोबर या गोष्टी आवश्यक आहे. माणसाचं मन आनंदी असेल तर ऊर्जा प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे जाता येतं. या राज्यात परिवर्तनाचं पर्व सुरू झालं आहे. हे विकासाचं पर्व असेल. या राज्याचा आपल्याला विकास करायचा आहे. जिथे जातो तिथे लोक उत्सफुर्त प्रतिसाद देत आहेत, असं ते म्हणाले.

Amruta Fadnavis : “भक्तीत तल्लीन व्हा…” दिवाळीच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांच्या नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

यंदा ठाण्यात ठाकरे व शिंदे गटाची अशी मिळून एकूण ११ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ठाकरे व शिंदे गटाची बॅनर बाजी पाहायला मिळाली. तलावपाळी वरील दिवाळी पहाट चे आयोजन करण्यावरून बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव सेनेत निर्माण झालेल्या वादावर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला. आणि मासुंदा तलाव येथील दिवाळी पहाटच्या आयोजनाचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. दरम्यान, उद्धव सेनेचे खा.राजन विचारे यांनाही हाकेच्या अंतरावर गडकरी रंगायतन नजीकच्या डॉ. मूस रोड चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या आयोजनाची परवानगी मिळाली होती.तर, तलावपाळीवरील रंगो बापूजी चौकात शिंदे गटाच्याच महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे यांच्यावतीने दिवाळी पहाट होत असल्याने संपुर्ण तलावपाळी परीसर तरुणाईने फुलणार आहे.

Lakshmi Pooja : लक्ष्मी पूजन करण्यासाठी योग्य मुहूर्त आणि पद्धत, जाणून घ्या सविस्तर माहिती

Latest Posts

Don't Miss