spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CIDCO Lottery : दिवाळीनिमित्त सिडकोचे सामान्यांना गिफ्ट; आता नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण

नवी मुंबई सारख्या शहरात आपलं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाची इच्छा असते. मुंबईत राज्य आणि देशभरातील लाखो नागरीक आपलं नशीब आजमवण्यासाठी येतात. या मुंबईत तुम्ही स्थिर स्थावर झाले असाल, आणि आपल्या डोक्यावर एका हक्काच्या छप्परचा शोध घेत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता योग्य दरात नवी मुंबईत स्वत:चं हक्काचं घर विकत घेऊ शकता. कारण सिडकोकडून लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. सिडकोकडून ७ हजार ८४९ घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

कुरुक्षेत्र असो की लंका – युद्ध हा शेवटचा पर्याय; पंतप्रधान मोदी कारगिलमध्ये दिवाळीनिमित्त सैनिकांना

लॉटरी कोणत्या परिसरातील घरांसाठी?

सिडकोने लॉटरी जाहीर केलेली ७८४९ घरे ही नवी मुंबईतील उलवे नोडमधील खारकोपर पूर्व २, ए २ बी आणि पी३, बामणडोंगरी येथील आहेत. ही घरे नवी मु्ंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरूळ-उरण रेल्वे मार्गाजवळ आहे.

हेही वाचा : 

Surya Grahan 2022 : दिवाळीनंतर होणाऱ्या सूर्यग्रहणाला, या ६ राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी

सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, नव्याने उभारण्यात येत असलेली गृहसंकुलामध्ये उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा असणार आहेत. गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी सुविधा देखील उपलब्ध असणार आहेत.

याआधी गणेश उत्साहाच्या मुहूर्तावर सिडकोने घरांसाठी सोडत जाहीर केली होती. सदनिका, व्यावसायिक गाळे आणि भूखंड अशी मेगा लॉटरीसाठी सोडत जाहीर करण्यात आली होती. यामध्ये ४१५८ घरं, 245 दुकानं आणि सहा मोठ्या भूखंडांचा देखील समावेश होता. त्याचवेळी यंदा दिवाळीत मुंबईमध्ये घरांची सोडत काढण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणानं घेतला होता. यानंतर आता ही लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलातील ४१५८ घरांची सोडत काढण्यात आलेली. त्यातील ४०३ घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता राखीव होती. तर उर्वरित ३७५४ घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध होती.

Diwali 2022 : मुख्यमंत्री शिंदे ठाण्यात ‘दिवाळी पाहाट’ निमित्त उपस्थित, ठाणेकरांच्या जल्लोष द्विगुणीत

Latest Posts

Don't Miss