spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हुसंख्य पक्षाच्या खासदारांनी यूकेच्या पंतप्रधानपदासाठी ऋषी सुनक यांना दिला होकार

ज्या ब्रिटनने भारतासारख्या खंडप्राय देशावर तब्बल १५० वर्ष अनन्वित अत्याचार करत राजवट केली, त्याच ब्रिटनच्या सर्वोच्चपदी भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान होण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय वंशाचे आणि इन्फोसिसचे संस्थापक एन. नारायण मूर्ती यांचे जावई असलेले ऋषी सुनक इंग्लंडच्या पंतप्रधानपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. माजी पंतप्रधान बोरीस जाॅन्सन यांनी नकार दिल्यानंतर ऋषी सुनक यांच्या नावाला पसंती वाढली आहे. जाॅन्सन यांनी सुद्धा सुनक यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. माजी गृह सचिव प्रीती पटेल यांनीही सुनक यांना पाठिंबा दिला आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी शंभर खासदारांचं बहुमत आवश्यक असतं. सध्या सुनक यांच्याकडे १४५ पेक्षा जास्त खासदारांचं समर्थन आहे. आज संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान ऋषी सुनक यांचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतली आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचं पंतप्रधानपद जवळपास निश्चित मानलं जात आहे. जॉन्सन यांनी रविवारी रात्री आपला निर्णय जाहीर केला. ”ही योग्य वेळ नाही” असं जॉन्सन म्हणालेत. कालच ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदाची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था आम्हाला बळकट करायची आहे. पक्षाला एकजूट करुन देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यासाठीच पंतप्रधान पदासाठी निवडणूक लढवत आहे, असं सुनक म्हणाले होते. जॉन्सन यांच्या माघारीमुळे सुनक यांचं पंतप्रधानपद निश्चित मानलं जातंय.

ब्रिटनच्या पंतप्रधान (Prime Minister of Britain) लिझ ट्रस (Liz Truss) यांनी ४५ दिवसांच्या कार्यकाळानंतर गुरुवारी अचानक राजीनामा दिला. लिझ ट्रस राजीनामा देणार असल्याचा अंदाज अनेक दिवसांपासून लावला जात होता. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या निधनाच्या काही दिवस आधी लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांची पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्याशी स्पर्धा सुरु होती. आता लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा :

‘भास्कर जाधव यांच्या हल्ल्याची सीबीआय चौकशी व्हावी’; राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदमांची मागणी

सितरंग चक्रीवादळ बंगालच्या जवळ; ‘या’ राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss