spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भारतीय वंशाचे ऋषी सुनक झाले ब्रिटनचे नवे पंतप्रधान

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. दीडशेपेक्षा जास्त खासदारांचं समर्थन सुनक यांना मिळालं होतं. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काल पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतल्यानंतर ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर होतं. ऋषी सुनक हे ब्रिटनचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी शंभर खासदारांचं बहुमत आवश्यक असतं. संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान सुनक यांच्या नावाची घोषणा झाली.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून त्यांनी इतिहास रचला आहे. ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डोंटचा पराभव करून विजय मिळवला आहे. ऋषी सुनक यांच्या समर्थनार्थ १८५ हून अधिक खासदार आहेत. तर पेनी मॉर्डंट यांना केवळ २५ खासदारांचा पाठिंबा मिळू शकला. औपचारिक घोषणेनंतर, ऋषी सुनक हे २८ ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात आणि २९ ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते.

ब्रिटनच्या पंतप्रधान (Prime Minister of Britain) लिझ ट्रस (Liz Truss) यांनी ४५ दिवसांच्या कार्यकाळानंतर गुरुवारी अचानक राजीनामा दिला. लिझ ट्रस राजीनामा देणार असल्याचा अंदाज अनेक दिवसांपासून लावला जात होता. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या निधनाच्या काही दिवस आधी लिझ ट्रस यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांची पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्याशी स्पर्धा सुरु होती. आता लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत.

हे ही वाचा :

Muhurat Day Market 2022 LIVE: सेन्सेक्स ६६२ अंकांनी वाढून ५९,९६५ वर उघडला

हुसंख्य पक्षाच्या खासदारांनी यूकेच्या पंतप्रधानपदासाठी ऋषी सुनक यांना दिला होकार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss