spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sitrang Cyclone : ‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात पाच बळी तर, भारतात अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या सितरंग चक्रीवादळाचा परिणाम आता दिसून येत आहे. सितरंग चक्रीवादळ बांगलादेशात रात्री उशिरा देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवर धडकले आहे. बांगलादेशात सितरंग चक्रीवादळाच्या तडाख्याने पाच जणांचा मृत्यू झाला. बरगुना, नराइल, सिराजगंज जिल्हे आणि भोला बेट जिल्ह्यातील पाच जणांचा या चक्रीवादळाच्या तडाख्यात मृत्यू झाला आहे, असे आपत्ती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने एएफपीने म्हटले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा तयार झाल्याने सितरंग चक्रीवादळ तयार झालं. त्याचा फटका बांगलादेशला बसला आहे. तर भारतातही या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मेघालयमध्ये शाळा बंदा ठेवण्यात आल्या आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Kishori Pednekar : १२ आमदारांच्या यादीत तेरावा नंबर कुणाचा?, कदमांच्या टीकेला किशोरी पेडणेकरांचे जशास तसे उत्तर

मीडिया रिपोर्टनुसार, चक्रीवादळाचा तडाखा बसल्याने बांगलादेशमध्ये सोमवारी पाच जणांचा मृत्यू झाला. एएफपी वृत्तसंस्थेने आपत्ती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाचे प्रवक्ते निखिल सरकार यांच्या हवाल्याने माहिती दिली आहे. सितरंग चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे. बांगलादेशातील सितरंग चक्रीवादळाचा वाढता धोका पाहता नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. सखल भागातून हजारो नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

चक्रीवादळ सितरंगमुळे दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव आधीच दिसून येत आहे, तर ढाकासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये संततधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने सोमवारी संध्याकाळी जारी केलेल्या आपल्या अहवालात, पायरा, मोंगला आणि चितगाव बंदरांना धोक्याचे सिग्नल वाढवण्यास सांगितले आणि कॉक्स बाजार बंदरांना १० च्या प्रमाणात धोक्याचा सिग्नल क्रमांक ६ कायम ठेवण्याचा सल्ला दिला.

Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत केली दिवाळी साजरी

‘या’ राज्यांमध्ये आज पावसाची शक्यता

सीतारंग चक्रीवादळामुळे भारताच्या काही भागात पावसाची शक्यता आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून पश्चिम बंगालमधील सखल भागातून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. १०० हून अधिक मदत केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत. हवामान खात्यानुसार, मंगळवारी (२५ऑक्टोबर) रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Latest Posts

Don't Miss