spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘मातोश्री’चा किल्ला भक्कम ; दिवाळीनिमित्त मातोश्री निवासस्थानी आदित्य ठाकरे किल्ला उभारण्यात रमले

दिवाळी म्हटलं की फटाके, फराळ तसेच, नव्याने खरेदी आली, चिमुकल्यांच्या शाळांना सुट्टी आली अन् सुट्टीत किल्ला बांधणी आली. दिवाळीच्या सणात गावापासून शहरापर्यंत किल्ले बांधण्याची प्रथाच रुजू झाली आहे. आपल्या घरामोर मातीचा किल्ला बांधून काव म्हणजे तपकिरी रंगाने तो सजविण्यात जी मजा असते ती औरच. प्रत्येक मराठी माणसानं आपल्या घराच्या अंगणात अनेकदा असे किल्ले बनवले असतील. किल्ल्यावर खेळण्यातील मावळे आणि शिवरायांचे सिंहासन ही शालेय जीवनातील सर्वात आनंददायी गोष्ट. हाच आनंद शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा अनुभवला आहे.

Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत केली दिवाळी साजरी

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी दिवाळीनिमित्त आपल्या मातोश्री या निवासस्थानी मातीचा किल्ला उभारला. किल्ला बनवताना ते चिमुकल्यांसह रमलेले पहायला मिळाले. अत्यंत रेखीव असा किल्ला या सर्वांनी मिळून साकारला, याचा व्हिडिओ समोर आला आहे.

हेही वाचा :

Sitrang Cyclone : ‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात पाच बळी तर, भारतात अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता

आदित्य ठाकरेंनी दिवाळीनिमित्त मातोश्री या निवासस्थानी मातीचा किल्ला उभारला. किल्ला बनवताना ते चिमुकल्यांसह रमलेले पहायला मिळाले. अत्यंत रेखीव असा किल्ला या सर्वांनी मिळून साकारला, आदित्य यांच्या हाती ब्रश दिसत असून ते मातीच्या किल्ल्या रंग देताना दिसून येतात. आदित्य यांना किल्ला बांधणीत सहभाग झाल्याचं पाहून अनेकांनी त्यांचा फोटो आणि व्हिडिओ काढला. त्यापैकी, एक व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे.

सत्तातरानंतर पक्ष फुटल्यानं येत्या काळात उद्धव ठाकरे गटाला मोठी मेहनत करावी लागणार आहे. येत्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक देखील आहे. यामध्ये त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. यापार्श्वभूमीवर नव्या युती आणि नव्या लोकांची जुळवाजुळव सध्या उद्धव ठाकरेंकडून सुरु आहे. एकनाथ शिंदेंचा गट भाजपसोबत असल्यानं त्यांच्यासमोर मोठं आव्हान आहे.

Kishori Pednekar : १२ आमदारांच्या यादीत तेरावा नंबर कुणाचा?, कदमांच्या टीकेला किशोरी पेडणेकरांचे जशास तसे उत्तर

Latest Posts

Don't Miss