spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यात अग्नी तांडव

काल दिवाळीमधला महत्वपूर्ण दिवसा म्हणजे लक्षमीपूजन ओळखले जाते. दोन वर्ष कोरोना काळात अनेकांना दिवाळी आनंदाने साजरा करता आली नाही पण या वर्षी मोठ्या प्रमाणात दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला. पण लक्ष्मीपूजना दिवशी पुण्यात अग्नितांडव पहिला मिळाला. दिवाळी सणात लक्ष्मीपूजनाच्या सोमवारी दिवशी शहरात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यामुळे शहरातील विविध भागातील सहा ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना घडली. घोरपडी येथील एका सोसायटीतील पार्किंग मध्ये फटाक्यांमुळे दुचाकींना आग लागली, त्यात आठ दुचाकी जलाल्या. सोमवारी रात्री उशीरापर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात फटाक्यांमुळे आग लागण्याच्या किरकोळ घटना घडल्या.

पुण्यातील पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीमधील गल्ली क्रमांक ४७ येथे एका झाडाला फटाक्यांमुळे आग लागली. विश्रांतवाडीतील सिरीन हॉस्पिटल पेटत्या फटाक्यामुळे झाडाला आग लागली. तर कात्रजमधील आंबेगाव पठार येथील साईसिद्धी चौकातही आग लागल्याची घटना घडली. सोसायटीतील सदनिकेच्या गॅलरीत ठेवलेल्या साहित्यावर फटाक्यांची ठिणगी पडल्याने हि आग लागली होती.वारजे माळवाडीत चैतन्य चोैकातील युनिव्हर्सल सोसायटीत एका बंद सदनिकेते आग लागली. तर रात्री साडेआठ वाजता घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर बिटाटेल एनक्लेव्ह सोसायटीत फटाक्यांमुळे आग लागली. फटाक्यांमुळे पार्किंगमधील आठ दुचाकी पेटल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी घेऊन आग आटोक्यात आणली. सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे येथील ज्ञानदीप शाळेच्या छतावर पडलेल्या पालापाचोळ्याने पेट घेतला. अग्निशामक दलाचे सहायक विभागीय अधिकारी रमेश गांगड, वाहनचालक शाहनवाज सय्यद सोमवारी दुपारी वाहनातून धानोरी परिसरातून जात होते. त्यावेळी एका रिक्षाच्या सीएनजी टाकीतून गळती होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. रिक्षातून सीएनजी गळती झाल्यानंतर रिक्षाचालक आणि प्रवासी बाहेर उतरले होते. या घटनेमुळे धानोरी रस्त्यावरील काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी शहरात फटाक्यांमुळे एकापाठोपाठ आग लागण्याच्या घटना घडल्याने जवांनाची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान सहा ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

हे ही वाचा :

‘मातोश्री’चा किल्ला भक्कम ; दिवाळीनिमित्त मातोश्री निवासस्थानी आदित्य ठाकरे किल्ला उभारण्यात रमले

Sitrang Cyclone : ‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात पाच बळी तर, भारतात अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss