spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दगडाला पाझर फुटत नव्हता म्हणूनच ५० आमदार सरकारमधून बाहेर पडले; मंत्री दीपक केसरकर

काही दिवसांपूर्वी शिवसेना बाळासाहेब ठरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद दौरा केला. त्यात त्यांनी अनेक शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिंदे फडणवीस सरकारवर जोर दार हल्लाबोल केला. दगडाला पाझर फुटत नव्हता म्हणूनच ५० आमदार सरकारमधून बाहेर पडले असल्याचे सांगत राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी माध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. पक्ष नेतृत्वावर बोलताना मनाला वेदना होत आहेत. पण दगडाला पाझर फुटला नाही म्हणूनच ५० आमदार फुटले हेच सत्य असल्याचे केसरकर यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंना तेव्हा पाझर फुटला असता, शिवसैनिकांना साध्या भेटी दिल्या असत्या, जनतेची गाऱ्हाणी समजून घेतली असती तर पक्षामध्ये बंड का झालं असतं का ?, असा सवाल दीपक केसरकर यांनी उपस्थित केला.

ज्यावेळी वीस आमदार आले आणि हे सर्व मिटवूया, सर्वांनी एकत्र येऊया असे सांगत असताना कोण सांगत होतं की तुम्हीही त्यांच्याबरोबर निघून जा ? त्यावेळी पाझर का नाही फुटला ? बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना कुठेतरी अडचणी येणार हे माहीत असूनही आमदारांना जा म्हणणं याला काय म्हणायचं ? हा देखील प्रश्न आहे. आम्ही कुणावर टीका करत नाही. आमची दुःख आमच्या हृदयात आहेत. ती सांगून आम्हाला मतं मिळवायची नाहीत. आमच्या कामावर आम्हाला मतं मिळवायची आहेत. ते आम्ही करून दाखवू. अडीच वर्ष तुम्हाला लोकांनी संधी दिली. आता अडीच वर्षात आम्ही काय करतो ते बघा आणि नंतर लोक काय म्हणतात ते ऐका. केवळ लोकांना भडकवल्याने सरकार चालत नसते, त्याने जनतेचे कल्याण होत नसते. त्यासाठी दिवसरात्र काम करावे लागते, असा टोलाही केसरकर यांनी लगावला.

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सीबीआयला राज्यातील घडामोडींचा तपास आणि एफआयआर नोंदवण्यास सर्वसाधारण मान्यता दिली आहे. यासह, शिंदे सरकारने मागील महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या किमान अर्धा डझन निर्णयांना स्थगिती दिली आहे किंवा ते रद्द केले आहेत. नवीन सरकार सत्तेवर येताच आधीच्या सरकारचे निर्णय बदलते, असा ट्रेंड महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा :

Solar Eclipse 2022 : खगोल प्रेमीसाठी आनंदाची बातमी! ‘या’ राज्यात दिसणार सूर्यग्रहण

दिवाळीनिमित्त आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये सैनिकांची मिठाईची देवाणघेवाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss