spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Ram Setu Twitter Review : राम सेतू चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिल्या रिअँक्शन

बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमारनं (Akshay Kumar) त्याच्या चाहत्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असणारा अभिनेता अक्षय कुमारनं (Akshay Kumar) त्याच्या चाहत्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. त्याचा राम सेतू (Ram Setu) हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

या चित्रपटाच्या नावावरून स्पष्ट होत आहे की हा चित्रपट प्रभू रामाच्या नावाभोवती फिरताना दिसणार आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची कथा ‘राम सेतू’च्या शोधावर आधारित असून अक्षय कुमार याच पुलाच्या शोधात निघतो. अक्षय पुरातत्वशास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे. केवळ निर्मात्यांनाच नाही तर चाहत्यांनाही या चित्रपटाकडून खूप आशा आहेत कारण या वर्षी अक्षय कुमारने तीन फ्लॉप चित्रपट दिले आहेत. त्यामुळे अक्षयसाठीही हा चित्रपट चाहत्यांना आवडतो हे महत्त्वाचे आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत असून अनेकांनी या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 राम सेतू चित्रपटातील VFX, चित्रपटाचं कथानक, कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटात अक्षयनं पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे, ज्याला राम सेतूबाबत संशोधन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या चित्रपटातील अक्षयच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

 एका यूजरने लिहिले, ‘धन्यवाद भाऊ. राम सेतू साठी सर्व शुभेच्छा. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना आणखी एका यूजरने लिहिले, ‘राम सेतू दिन.’ तिसऱ्या यूजरने लिहिले, ‘इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट रामसुते.’ त्याच वेळी, एका वापरकर्त्याने चित्रपटाच्या पूर्वार्धाचे कौतुक केले आणि लिहिले, ‘इंटरव्हलपर्यंत सर्व काही ठीक चालले आहे. चित्रपट विषयापासून विचलित होत नाही. दुसऱ्या युजरने लिहिले, ‘राम सेतू फर्स्ट हाफ…. विलक्षण… चांगली संकल्पना.’ या वापरकर्त्याने फायर इमोजी देखील एकत्र केले आहेत.

 एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘हा चित्रपट एका कोड्यावर आधारित आहे. चित्रपटात अक्षयची एनर्जी कमाल आहे.’ या युझरनं या चित्रपटाला चार स्टार दिले आहेत. तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘राम सेतू या चित्रपटात अक्षय कुमारची धमाकेदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. हा मास्टरपीस आहे.’

 राम सेतू या चित्रपटाचं शूटिंग उटी, दमण- दीव आणि मुंबईच्या जवळ झाले आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. केप ऑफ गुड होप, अँमेझॉन प्राइम, एबंडंटिया एंटरटेनमेंट आणि लायका प्रॉडक्शन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 रामायणानुसार, श्रीलंकेला जाण्यासाठी भगवान श्रीरामाच्या सैन्याने ‘राम सेतू’ बांधला होता आणि ‘राम सेतू’ चित्रपटाची कथा एका पुरातत्वशास्त्रज्ञाची आहे. अक्षय कुमार ही व्यक्तिरेखा साकारत आहे. या ट्रेलरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे राम सेतू पाडण्याची मागणी केली आहे, त्यानंतरच पुरातत्वशास्त्रज्ञाला राम सेतू आहे की नाही यावर संशोधन करण्यासाठी पाठवले जाते. आता या चित्रपटातून इतिहासाची पाने कशी छेडली गेली? हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल.

हे ही वाचा:

शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; नाना पटोलेंची मागणी हास्यास्पद-एकनाथ शिंदे

Whatsapp news : व्हॉट्सअॅप डाऊन, सेवांमध्ये व्यत्यय येत असल्याची वापरकर्त्यांची तक्रार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss