spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

१३ जणांची कमिटी यावर निर्णय घेते; मनसे युतीबाबत चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टी , महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाची मनसेसोबतची जवळीक वाढली आहे. मनसेने दिवाळीनिमित्त शिवाजी पार्कवर रोषणाई केली होती, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंसोबत उपस्थित होते.

मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टी , महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाची मनसेसोबतची जवळीक वाढली आहे. मनसेने दिवाळीनिमित्त शिवाजी पार्कवर रोषणाई केली होती, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंसोबत उपस्थित होते. यादी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेने अध्यक्ष राज ठाकरे , राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिघांच्या अनेक वेळा भेटी झाल्या होत्या त्यांच्या या वारंवार होत असलेल्या भेटीमुळे हे तिन्ही पक्ष एकत्र येणार का अश्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. परंतु या सर्व पार्शवभूमीवर ‘मनसेच्या युतीबाबत कोणताही प्रस्ताव नसून तशी चर्चाही झाली नाही असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

मनसे, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या जवळीकीबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आलं. ‘मनसेच्या युतीबाबत कोणताही प्रस्ताव नसून तशी चर्चाही झाली नाही. अशी युती करायची असेल तर भाजपच्या कोअर कमिटीसमोर त्याचा प्रस्ताव यावा लागतो. १३ जणांची कमिटी यावर निर्णय घेत असते, त्यामुळे याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

भाजप नेते आणि एकनाथ शिंदे यांनीही मागच्या काही दिवसांमध्ये अनेकवेळा राज ठाकरेंची भेट घेतली आहे. श्रीकांत शिंदे यांनीही राज ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे. मनसेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र आले होते. पण, या कार्यक्रमामध्ये आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असा मोठा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. दिवाळीमध्ये आम्ही मनसेच्या कार्यक्रमाला गेलो होतो. राज ठाकरे यांनी मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं होतं. दिवाळीचा सण आनंदाचा साजरा होताना आपण राज्यामध्ये पाहत आहोत. यावेळी आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

Whats App : दोन तासानंतर व्हॉट्सअॅप सेवा पूर्ववत

Ram Setu Twitter Review : राम सेतू चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिल्या रिअँक्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss